अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर सातारा जिल्ह्यात कारवाई; 365 वाहनांवर दंड

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर सातारा जिल्ह्यात कारवाई; 365 वाहनांवर दंड

HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर सातारा जिल्ह्यात कारवाई; 365 वाहनांवर दंड

सातारा : दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या सर्व जुन्या वाहनांना हाय सिक्युरिटी रजिस्ट्रेशन नंबर प्लेट (HSRP) बसविणे बंधनकारक करण्यात आले आहे. HSRP नंबर प्लेट बसविण्यासाठी 30 जून 2026 पर्यंत अंतिम मुदत देण्यात आली होती. ही मुदत संपल्यानंतर 1 जुलै 2026 पासून HSRP नंबर प्लेट न बसविणाऱ्या वाहनांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

केंद्रीय मोटार वाहन नियम 1989 मधील नियम 50 तसेच मोटार वाहन अधिनियमातील कलम 177 अन्वये ही कारवाई करण्यात येत आहे. सातारा प्रादेशिक परिवहन कार्यालयाच्या वतीने जिल्ह्यातील विविध विभागांमध्ये 1,283 वाहनांची तपासणी करण्यात आली. यामध्ये 365 वाहनांवर HSRP नंबर प्लेट नसल्याचे आढळून आल्याने कारवाई करण्यात आली असून, 13 हजार रुपयांचा दंड वसूल करण्यात आला आहे.

सर्व शासकीय वाहनांनाही HSRP नंबर प्लेट बसवून घेण्याच्या सूचना देण्यात आल्या आहेत. तसेच शासकीय अधिकारी व कर्मचाऱ्यांनी दि. 1 एप्रिल 2019 पूर्वी नोंदणी झालेल्या त्यांच्या वैयक्तिक वाहनांनाही HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन करण्यात आले आहे.

वाहनांची ओळख आणि सुरक्षितता अधिक सक्षम करण्यासाठी नागरिकांनी आपल्या जुन्या वाहनांना HSRP नंबर प्लेट बसवून घेणे आवश्यक असून, वाहनधारकांनी विलंब न करता HSRP नंबर प्लेट बसवून घ्यावी, असे आवाहन परिवहन विभागाकडून करण्यात आले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket