Post Views: 58
सातारा शहरात न्यायाधीशाला लाच घेताना रंगेहाथ पकडले
सातारा :साताऱ्यात एका न्यायाधीशाला पाच लाख रुपयांची लाच घेताना रंगेहाथ पकडण्यात आले आहे. या घटनेमुळ एकच खळबळ उडाली आहे. धक्कादायक म्हणजे न्यायालयाच्या आवारातच ही घटना घडली आहे. या प्रकरणी न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासहत तिघांविरोधात गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर वृत्त असे की, फिर्यादीचे वडिल तुरुंगात होते. वडिलांना जामीन हवा असेल तर पाच लाख रुपये दे अशी मागणी साताऱ्याचे जिल्हा व सत्र न्यायालयाचे न्यायाधीश धनंजय निकम यांनी केली. एका हॉटेलमध्ये ही रक्कम देण्याचे ठरले. यावेळी लाचलुचपत विभागाने सापळा रचला आणि न्यायाधीश धनंजय निकम यांच्यासह तिघांना ही लाच स्विकारताना रंगेहाथ पकडलं. पोलिसांनी निकम यांच्यासह तिघांविरोधात गुन्हा दाखल केला असून पुढील कारवाई सुरू केली आहे.