Post Views: 186
सातारा बसस्थानकासमोर झालेले अपघातात एकाचा जागीच मृत्यू
सातारा : तिहेरी अपघातात एकाचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना सातारा बसस्थानक परिसरात घडली आहे.याबाबत मिळालेल्या माहितीनुसार, सातारा बसस्थानकासमोर सायंकाळी पाच वाजण्याच्या सुमारास शिवाजी राजाराम मोरे हे दुचाकीवरून पोवई नाक्याकडे निघाले होते. बसस्थानकासमोर आल्यानंतर त्यांच्या दुचाकीला शेजारून जाणाऱ्या अन्य एका दुचाकीची धडक बसली. यात ते खाली पडले. याचवेळी पाठीमागून आलेल्या ट्रकचे चाक त्यांच्या डोक्यावरून गेले. यामुळे त्यांचा जागीच मृत्यू झाला.
