Home » ठळक बातम्या » सरपंच परिषदेच्या मागणीला अखेर यश

सरपंच परिषदेच्या मागणीला अखेर यश

सरपंच परिषदेच्या मागणीला अखेर यश

सातारा-प्रतिनिधी घरकुल योजनेच्या जाचक अटी कमी करुन अनुदानाची रक्कम १ लाख २० हजार नको, २ लाख ५० हजार करा, हि मागणी नागपूर अधिवेशनावेळी शासनाकडे सरपंच परिषद, पुणे कडून शेकडो सरपंचांच्या उपस्थितीत निवेदन देऊन केली होती. राज्य शासनाने ही मागणी योग्य असल्याने दखल घेत काही अटी कमी करत प्रत्येक घरकुलासाठी २ लाख केले. सरपंचांच्या मागण्याची दखल घेतल्याबद्दल सरपंच परिषदेच्या पाठीशी शासन असल्याचे परिषदेचे मार्गदर्शक बनवडीचे आदर्श सरपंच डॉ.शंकर कापे यांनी सांगितले.

 

गावाच्या सर्वांगीण विकासासाठी सर्वोत्तम योगदान देणाऱ्या सरपंचांच्या अनेक अडचणी, मागण्या सोडविण्यासाठी महाराष्ट्रात सरपंच परिषद, पुणे नेहमीच आघाडीवर आहे. सरपंचांचे संघटन उभे करत सरपंच , उपसरपंच मानधनाचा प्रश्न यशस्वी सोडवला. तर कामकाज करताना येणाऱ्या अडचणी, मागण्या निवेदन,आंदोलन, मोर्चा, उपोषण अशा सनदशीर मार्गाने राज्यभरात लक्षवेधी कार्य केले आहे.

 

गावागावात घरकुल योजनेच्या पात्र लाभार्थीना काही जाचक अटी आणि कमी अनुदान असल्याने लाभ मिळत नाही. यावर सरपंच परिषदेने नागपूर येथे शेकडो सरपंचांनी तत्कालीन आमदार बच्चू कडू यांना निवेदन देत चर्चा केली. याबाबत बच्चू कडू यांनी काही मंत्री आणि प्रशासकीय अधिकाऱ्यांशी चर्चा करत घरकुल योजनेच्या अटी शर्ती कमी करत अनुदान अधिक करण्यासाठी सकारात्मक प्रतिसाद दिला होता.

 

प्रत्यक्षात पंतप्रधान आणि मुख्यमंत्र्यांनी घरकुल योजनेची प्रभावीपणे अंमलबजावणी करण्याबाबत विशेष सुचनाही दिल्या.त्यात काही अटी शर्ती शिथिल करत अनुदान वाढवल्यामुळे लाभार्थ्यांना दिलासा मिळाला. सरपंच परिषदेने ही योजना यशस्वी करण्यासाठी प्रशासनाला शक्य ते प्रयत्न करताना केलेले कार्य उल्लेखनीय असल्याचे मत सरपंच परिषदेचे राज्याध्यक्ष जितेंद्र भोसले आणि महिला राज्याध्यक्ष झीनत सय्यद यांनी व्यक्त केले.

 

सरपंच परिषदेच्या वतीने सरपंच आणि सदस्यांच्या अनेक मागण्यांसाठी 

मंदाकिनी सावंत, विक्रमसिंह जाधव, फत्तेसिंह जाधव, सुरेखा डुबल, संतोष शेळके, सतीश इंगवले, रणजित पाटील, प्रताप चव्हाण,अमर माने, विष्णू गायकवाड, संपत देशमुख, युवराज भोईटे, जीवन जाधव, सुरज कीर्तिकर, वैशाली पाटील, शुभांगी घाडगे, अरविंद शेडगे, अजित माने, प्रवीण भोसले, निलेश झांजुर्णे, किरण जाधव, अजित भोसले, मंगेश क्षीरसागर, मंगेश जगताप, अमिता भोईटे, सारिका चव्हाण, डॉ. महेश पवार, सचिन माने, शीतल देशमुख, सुनीता मगर, वृषाली रोमन,योगेश भोसले, रामचंद्र सावंत, राजश्री खरात – पाटील, जयश्री चव्हाण, रविंद्र शेलार, रवींद्र सल्लक,रामचंद्र सावंत, राजश्री खरात पाटील, जयश्री चव्हाण, रविंद्र शेलार, रवींद्र सल्लक, सचिन मोरे, धनश्री शिंदे, हर्षवर्धन भोसले, मेघा सावंत, शीतल गायकवाड, विद्या घबाडे, सुप्रिया पाटील,सुचेता मोहिते, बापूराव पाटील,संदीप पाटील, अशोक झिंबरे बापू, गीतांजली थोरात, सुवर्णा कापूरकर, संतोष शेडगे, अविनाश पाटील, संदीप पाटील, आदींनी सातत्याने पाठपुरावा करण्यासाठी योगदान देत आहेत.

सरपंच मानधन प्रश्न निकाली 

तोडक्या मानधन असताना परदमोड करून गाव कारभार बघणाऱ्या सरपंचांचे मानधन वाढविण्यासाठी सरपंच परिषद, पुणे यशस्वी झाली. मात्र लालफिती कारभारात वेळेवर मानधन वितरण होत नाही.याविरोधात उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि सातारचे पालकमंत्री ना.शंभूराज देसाई यांना पदाधिकाऱ्यांनी भेटून निवेदन देत चर्चा केली. सरपंच परिषदेच्या निवेदनाची दखल घेत मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस ग्रामविकास मंत्री जयकुमार गोरे राज्य मंत्री योगेश कदम यांनी महाराष्ट्रातील सरपंच, उपसरपंचांचे थकीतसह आजपर्यंतचे मानधन तत्काळ वितरीत झाले.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड

Post Views: 303 बावधन ग्रामपंचायत सरपंच पदी सौ वंदना जगदीश कांबळे यांची निवड वाई प्रतिनिधी (शुभम कोदे)आज झालेल्या बावधन ग्रामपंचायतीच्या

Live Cricket