संजय राऊत यांचा आरोप, “देवेंद्र फडणवीस अर्बन नलक्षलवादाचे कमांडर धनंजय मुंडेंना त्यांचाच आशीर्वाद
प्रतिनिधी -अर्बन नक्षलवाद हा देवेंद्र फडणवीस यांचा आवडता शब्द आहे. अर्बन नक्षलवाद भाजपाच्या लोकांकडेच आहे. कारण ते रस्त्यावर खून करतात आणि तो पचवला जातो. बीडमधल्या अर्बन नक्षलवादाला देवेंद्र फडणवीस, भाजपा आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचं समर्थन आहे का? हे त्यांनी सांगायला पाहिजे. तुम्ही आमच्याकडे एक बोट दाखवता तेव्हा चार बोटं तुमच्याकडे आहेत हे विसरु नका असं संजय राऊत यांनी म्हटलं आहे. बीड आणि परभणीच्या प्रकरणांवरुन संजय राऊत यांनी देवेंद्र फडणवीस यांच्यावर जोरदार टीका केली.
बीडमधल्या हत्याकांडाचे सूत्रधार तुमच्या मंत्रिमंडळात आहेत. देवेंद्र फडणवीस यांना त्याची लाज वाटली पाहिजे. एक नाही दोन मंत्री त्याच भागातले आहेत. त्यांनी ही हत्याकांडं घडवलेली आहेत. शाहू, फुले, आंबेडकरांची नावं घ्यायला तुम्हाला लाज वाटते का? असा महाराष्ट्र घडवा असं या महापुरुषांनी सांगितल्याचं माझ्या स्मरणात नाही.