नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » राज्य » सांगली–सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) थेट सामना

सांगली–सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) थेट सामना

सांगली–सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघ : भाजप विरुद्ध राष्ट्रवादी (शरद पवार) थेट सामना

महाराष्ट्र विधान परिषद निवडणूक २०२६ अंतर्गत सांगली तथा सातारा स्थानिक प्राधिकारी मतदारसंघाच्या निवडणुकीत उमेदवारी अर्ज माघारी घेण्याच्या अंतिम टप्प्यानंतर चित्र स्पष्ट झाले आहे. तानाजी भगवान पाटील, प्रताप धोंडीराम पाटील, मयुर बाबासो पाटील आणि संजय नायकू मेंढे यांनी आपले अर्ज मागे घेतल्याने आता निवडणुकीच्या रिंगणात तीन उमेदवार उरले आहेत.

रिंगणातील उमेदवार

धैर्यशील ज्ञानदेव कदम — भारतीय जनता पक्ष

अभयसिंह खाशेराव जगताप — नॅशनलिस्ट काँग्रेस पार्टी (शरदचंद्र पवार)

किशोर हनमंत धुमाळ — अपक्ष

राजकीयदृष्ट्या पाहता या निवडणुकीत मुख्य लढत भाजपचे उमेदवार धैर्यशील कदम आणि राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार) पक्षाचे उमेदवार अभयसिंह जगताप यांच्यातच होणार असल्याचे चित्र आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांमधील मतदारांच्या संख्याबळामुळे ही निवडणूक भाजपसाठी प्रतिष्ठेची मानली जात आहे.

दुसरीकडे, पश्चिम महाराष्ट्रातील राजकारणात प्रभाव असलेल्या शरद पवार गटासाठीही ही निवडणूक महत्त्वाची ठरणार आहे. त्यामुळे अभयसिंह जगताप स्थानिक समीकरणे आपल्या बाजूने वळवून विजयाचा चमत्कार घडवतात का, याकडे सातारा आणि सांगलीसह संपूर्ण पश्चिम महाराष्ट्राचे लक्ष लागले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket