अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » Uncategorized » क्राईम डायरी » सांगली हादरली! आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर सपासप वार, राजकीय नेत्याचा खून

सांगली हादरली! आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर सपासप वार, राजकीय नेत्याचा खून

सांगली हादरली! आधी वाढदिवसाच्या शुभेच्छा, नंतर सपासप वार, राजकीय नेत्याचा खून

 सांगली -सांगली जिल्ह्यात मध्यरात्री डबल मर्डरचा प्रकार घडल्याने जिल्हा हादरून गेला आहे. दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्षाच्या वाढदिवसा दिवशी त्याच्यावर जीवघेणा हल्ला झाला आहे. या हल्ल्यात दलित महासंघाचे जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते हे जागीच ठार झालेत. याचवेळी मोहितेंच्या हत्येचा बदला बदला त्यांच्या पुतण्याने घेतला आहे. मोहिते यांच्या पुतण्याने हल्लेखोरावर पलटवार करत त्याचा देखील खात्मा केला.

सांगली जिल्ह्यात मध्यरात्री डबल मर्डर झाल्याने खळबळ उडाली आहे. तर गारपीर परिसरात मध्यरात्री झालेल्या भीषण हल्ल्यात उत्तम मोहिते यांचा जागीच मृत्यू झाला. मिळालेल्या माहितीनुसार, उत्तम मोहितेवर शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख यांनी जीवघेणा हल्ला केला. त्यानंतर उत्तमच्या पुतण्याने प्रत्युत्तरात शेखवर हल्ला केला असून, शेखही ठार झाला आहे.

मोहिते व शेख यांच्यातील जुन्या वादामुळे हा रक्तरंजित प्रकार घडल्याचे बोलले जात आहे. तर ही घटना पूर्व वैमनस्य, सुपारी की इतर कोणत्या कारणाने झाला आहे याचा तपास पोलिसांकडून सुरू आहे. या प्रकरणात चार आरोपींचा सहभाग असल्याची शक्यता व्यक्त केली जात असून, सांगली पोलिसांची संपूर्ण यंत्रणा घटनास्थळी दाखल झाली आहे. परिसरात तणावपूर्ण शांतता पसरली आहे.

मंगळवारी मध्यरात्री सांगलीत दलित महासंघाचे सांगली जिल्हाध्यक्ष उत्तम मोहिते यांचा वाढदिवस साजरा करण्यासाठी कार्यक्रमाचे आयोजन केले होते. याच वाढदिवसाच्या कार्यक्रमादरम्यान शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेखने मोहिते यांची गुप्तीने सपासप वार करत हत्या केली.

तर यावेळी हल्ला करणाऱ्या शाऱ्या उर्फ शाब्या शाहरुख शेख याच्यावरही उपस्थित जमावाने हल्ला केल्याने तोही ठार झाला. एकाच वेळी दोघांचा खून झाल्याने सांगली जिल्हा हादरला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket