महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » ठळक बातम्या » साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

साताऱ्यात उत्साहात पार पडली ‘समता दिंडी; डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांना अभिवादन

सातारा दि. 14 : भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून सातारा शहरात भव्य ‘समता दिंडी’ मोठ्या उत्साहात संपन्न झाली. सामाजिक समतेचा संदेश देणाऱ्या या दिंडीत विद्यार्थी आणि नागरिकांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदवला.

या समता दिंडीची सुरुवात श्रीमंत छत्रपती प्रतापसिंह हायस्कूल येथून करण्यात आली. सातारा जिल्हा परिषद अध्यक्षा डॉ. प्रिया शिंदे यांच्या हस्ते दिंडीला हिरवा झेंडा दाखवून मार्गस्थ करण्यात आले.या प्रसंगी  जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, पोलीस अधीक्षक तुषार दोशी, जात पडताळणी समितीचे अध्यक्ष जीवन गलांडे, प्रांताधिकारी आशिष बारकुल, तहसीलदार समीर यादव, समाज कल्याणचे सहायक आयुक्त सुनिल जाधव, जात पडताळणी समितीचे उपायुक्त उमेश घुले, समाज कल्याण अधिकारी श्रुती रकटे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

 प्रतापसिंह हायस्कूल येथून निघालेली ही दिंडी राजपथावरून मार्गस्थ झाली. दिंडीचा समारोप सातारा नगर पालिका येथील भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या पूर्णकृती पुतळ्यापाशी झाला. यावेळी उपस्थित सर्व मान्यवरांनी पुतळ्यास पुष्पहार अर्पण करून अभिवादन केले.

डॉ. बाबासाहेब आंबेडकरांचे विचार जनसामान्यांपर्यंत पोहोचवण्यासाठी आणि समतेचा संदेश देण्यासाठी अशा उपक्रमांची गरज आहे, अशा भावना यावेळी व्यक्त करण्यात आल्या.या दिंडीमध्ये शालेय विद्यार्थ्यांनी ढोल-ताशांच्या गजरात आणि घोषणांच्या जयघोषात सहभाग घेतला, ज्यामुळे संपूर्ण सातारा शहर आंबेडकरमय झाले. 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket