शहीद जवान सुनील यादव यांना अभिवादन
खंडाळा(नारायण ढमाळ)पारगाव येथे शहीद जवान सुनील यादव यांच्या स्मृतिदिनानिमित्त ग्रामस्थांच्या वतीने अभिवादन करण्यात आले. जवान सुनील यादव यांचे वर्ग मित्रांनी एकत्र येऊन अभिवादन केले. यावेळी समस्त पारगाव ग्रामस्थांच्या वतीने पुष्पचक्र अर्पण करून अभिवादन करण्यात आले.
ज्येष्ठ नेते बकाजीराव पाटील सरपंच अनिल रिटे बाजार समितीचे उपसभापती भानुदास यादव अजित यादव, बाळासाहेब यादव, चंद्रकांत यादव व खंडाळा पंचक्रोशीतील ग्रामस्थ व विद्यार्थी उपस्थित होते.