सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सभा उत्साहात संपन्न व १०% लाभांश जाहीर.
सातारा :धन्वंतरी पतसंस्थेची ३५ वी वार्षिक सर्वसाधारण सभा संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांचे अध्यक्षतेखाली नुकतीच खेळीमेळीच्या वातावरणात पार पडुन सभेतील सर्व विषयांना सभासदांनी सर्वानुमते मंजुरी दिली.
प्रथम धन्वंतरी देवतेचे पुजन जेष्ठ सभासद श्री. सुजीत शेख, श्री. अरूण पवार व श्री. एकनाथ चव्हाण यांचे शुभहस्ते करण्यात आले. त्यानंतर अहवाल वर्षात दिवंगत झालेले संस्थेचे सभासद, ठेवीदार, सेवक, हितचिंतक यांचे निधनाबददल श्रध्दांजली अर्पण करण्यात आली.
याप्रसंगी बोलताना संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा. राज्यपाल यांचे हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार देवून गौरविलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेला दि. ३१ मार्च २०२४ रोजी संपलेल्या आर्थिक वर्षात व्यावसायिक व्यवस्थापनाचा अंगीकार करुन व पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन २०२३-२०२४ मध्ये ढोबळ नफा रु. ५ कोटी ०७ लाख झाला असून सर्व कायदेशीर तरतूदी करुन संस्थेने रु ४ कोटी ४० लाख इतका निव्वळ नफा मिळविला आहे. सध्याच्या स्पर्धात्मक युगात आपल्या संस्थेस झालेला नफा हा नक्कीच सुयोग्य व्यवस्थापन व उत्कृष्ट कारभाराचे गमक आहे. यामध्ये आपल्या सर्वांचे मोलाचे सहकार्य, सहभाग आहे याची आम्हांस जाणीव आहे. ठेवीला चांगला व्याजदर देण्याचे व सभासदांना चांगला लाभांश देण्याचा प्रयत्न संचालक मंडळ या अहवाल वर्षात करेल असे आश्वासन त्यांनी यावेळी दिले. भविष्यातही संस्थेची सक्षमता व स्थैर्य असेच भक्कम राहणेचे दृष्टीने संस्थेने नियमाप्रमाणे एन.पी.ए. ची १०० % तरतुद केली आहे. तसेच संस्थेने सीबीएस कार्यप्रणाली सुरू केली असून संस्थेच्या ग्राहकांसाठी मोबाईल अॅप विकसीत केले आहे त्याचा लाभ सर्व ग्राहकांनी घ्यावा असे आवाहन त्यांनी यावेळी केले. विषयपत्रिकंतील सर्व विषयांना बहुमताने मंजुरी दिल्याबददल त्यांनी सर्वाचे आभार मानले. तसेच सभासदांना १०% लाभांश जाहीर होताच सर्व सभासदांनी टाळयांच्या गजरात स्वागत केल
तसेच पतसंस्थांच्या कर्जव्यवहाराची नोंद सीबील कार्यप्रणालीमध्ये व्हावी व पतसंस्थेच्या ठेवीना ५ लाखापर्यंत विमा संरक्षण मिळावे यासाठी राज्य व केंद्र शासन पातळीवर प्रयत्न करत असल्याचे नमूद केले. तसेच थकीत कर्जदार व त्यांचे जामीनदार यांनी थकहप्ते भरून संस्थेस सहकार्य करावे व कठोर कायदेशीर कारवाई टाळावी अशी विनंती केली.
संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते पुढे म्हणाले की, सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच, यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली असुन संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग ‘अ’ मिळाला आहे. ते पुढे म्हणाले की, व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे व माजी व्हा. चेअरमन डॉ. शिरीष भोईटे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी, वसुली अधिकारी या सर्वांच्या प्रयत्नांमुळे उत्तम कर्जवसुली झाली त्याबदद्ल त्यांचे विशेष अभिनंदन करतो. संस्थेचे संचालक मंडळाने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धोरण समोर ठेवून वेळोवेळी प्रभावीपणे निर्णय घेतले तसंच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देतन संस्थेचा कारभार नियोजनबध्द करुन संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे.
तसेच संस्थेच्या मुख्य कार्यालयासह शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकायनिच आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले.
व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेच्या प्रगतीत योगदान दिल्याबददल सर्व सहकारी संचालकांचे व सेवक बर्गाचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. तसेच संस्थेच्या व्यवसायात वाढ होण्यासाठी सभासदांनी कर्जवाटपाबाबत त्यांच्या काही सुचना असल्यास संचालक मंडळासमोर मांडण्याचे आवाहन केले तसेच संस्थेच्या हमखास उत्पन्न मिळवून देणारे व कमी जोखीम असलेल्या सोने तारण कर्जामध्ये वाढ होणेसाठी मिळत असलेला भरघोस प्रतिसाद असाच पुढे रहावा असे आवाहन केले. कृती आराखड्यानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त १.४७% इतकं अत्यल्प राखले आहे.
तसेच संस्थेने सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केली असून त्यामुळे ग्राहकांना एसएमएस बँकीग, मोबाईल बँकॉंग, आयएमपीएस, एनइएफटी व आरटीजीएस सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ सभासद घेत आहेत • संस्थेचे अधिकारी, कर्मचारी यांनी केलेले अहोरात्र कष्ट तसेच कार्यतत्पर, कर्तव्यदक्ष संचालक मंडळ, जनतेचा संस्थेवरील दृढ विश्वास यामुळेच संस्था दिवसेंदिवस उल्लेखनीय कार्य करीत आहे. स्थापनेपासून अ वर्ग, प्रतिवर्षी लाभांश अशा अनेक बाबीमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच ८.७५% आकर्षक व्याजदराची गृहखरेदी, वाहन खरेदी व सोने तारण योजना सुरु केली आहे. त्यामुळे संस्थेच्या विविध कर्जयोजनांचाही लाभ सर्व सभासदांनी घेवून संस्था व्यवसायवातीस हातभार लावण्याचे आवाहन त्यांनी केले. १ ऑक्टोंबर २०२४ पासून ठेवीचे व्याजदर वातविले आहेत तसेच जेष्ठ नागरिकांसाठी ८% व्याजदराची पेन्शन ठेव सुरू केली आहे त्याचा फायदा सर्वानी घ्यावा.
तसेच मुख्य कार्यालयामध्ये कामकाजाच्या दृष्टीने जागा अपुरी पडत असल्याने व इमारतसुध्दा खूपच जुनी झाल्याने ती पाहून त्याजागी प्रशस्त इमारत बांधकाम करणा असल्याचे त्यांनी सांगितले तसेच संस्थेचे काम मोठ्या प्रमाणावर वाढल्याने संस्थेसाठी नवीन चारचाकी वाहन घेण्यास व सामाजिक बांधिलकी व सभासदांच्या सोयीसाठी नवीन अॅम्बुलन्स घेणार असल्याचे त्यांनी याप्रसंगी सांगितले.
सुरक्षेच्या दृष्टीकोनातून सी.सी.टि.व्ही व सुरक्षा प्रणाली प्रत्येक शाखेत बसविली आहे. माहीती व तंत्रज्ञानाचा वापर संस्थेच्या सभासद, ग्राहकांना व्हावा यासाठी संस्थेने स्वतःची वेबसाईट कार्यान्वित केली असून त्याचाही लाभ सर्वांनी घ्यावा तसेच समाजाभिमुख कार्यामध्ये धन्वंतरीचा सहभाग असावा या हेतून नेत्रदान व देहदान याविषयी संस्थेतर्फे मोहीम राबविली जात असून त्याचा लाभ सर्वांनी घ्यावा असे आवाहन करून उपस्थितांचे आभार मानले.
यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी तथा कार्यलक्षी संचालक श्री. संजय यादवराव पवार यांनी विषयपत्रिकेचे वाचन करुन उपस्थित सभासदांचे शंका निरसन केले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळ, डॉ. शिरीष भोईटे.. डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. जयदीप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, डॉ. सुनिल कोडगुले, अॅड. सुर्यकांत देशमुख, सभासद, अधिकारी व कर्मचारी वर्ग उपस्थित होते