सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्था राज्यस्तरीय दिपस्तंभ पुरस्काराने सन्मानित
आर्थिकदृष्ट्या सक्षम व उत्तम व्यवस्थापन असलेल्या धन्वंतरी पतसंस्थेस तीच्या सहकार क्षेत्रातील उत्तम कार्याची तसेच सामाजिक व लोकाभिमुख कार्याची दखल घेवून महाराष्ट राज्य पतसंस्था फेडरेशनने राज्यातील पतसंस्थांसाठी सन २०२३-२४ करीता आयोजित केलेल्या दिपस्तंभ पतसंस्था पुरस्कार स्पर्धेत शंभर कोटीचेवर ठेवी असणा-या संस्थांच्या गटामध्ये उत्कृष्ट पतसंस्था म्हणून पुरस्कार मिळाला. हैद्राबाद येथील रामोजी फिल्म सिटीमध्ये आयोजित प्रशिक्षण शिबीर व दिपस्तंभ पुरस्कार वितरण सोहळा नुकताच पार पडला.
सदर पुरस्कार कॉसमॉस बँकेचे अध्यक्ष मिलींद काळे, राज्य फेडरेशनचे अध्यक्ष काकासाहेब कोयटे यांच्या हस्ते समारंभपूर्वक प्रदान करण्यात आला. सदर पुरस्कार संस्थेच्या वतीने संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले, व्हा.चेअरमन डॉ. कांत फडतरे, संचालक डॉ. शिरीष भोईटे, व मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी स्विकारला. पुरस्कार मिळाल्याची माहीती देताना डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, संस्थेने विविध स्तरावर उत्कृष्ट कामकाजाबादद्ल व सक्षम पतसंस्था म्हणून अनेक पुरस्कार मिळवले आहेत त्यामध्ये हा आणखी एक मानाचा तुरा गोविला गेला याचा मनस्वी आनंद होत आहे. संस्थेला मिळालेल्या पुरस्कारामुळे धन्वंतरी कुटुंबाबा आनंद द्विगुणीत झाला आहे. पतसंस्थेस जे यश मिळाले आहे ते सभासद, ठेवीदार, ग्राहक व हितचिंतक यांचे संस्थेवरील प्रेम व विश्वासामुळेच आहे. सर्वांनी दाखविलेले प्रेम व विश्वासामुळे सहकार खात्याच्या नियमाप्रमाणे या स्पर्धेच्या युगात संचालक मंडळास उत्स्फुर्तपणे काम करणे व संस्था वाडीकरीताच्या योजना यशस्वीपणे राबविणे शक्य झाले. तसेच संचालक मंडळाच्या योजनेनुसार अंमलबजावणी करणारे सेवक यांचेही यामध्ये महत्वाचे योगदान आहे. सभासद हा केंद्र बिंदु मानून सभासदांचेसाठी विविध उपक्रम संस्था राबवित असते. संस्थेच्या आज सर्व शाखा मुख्य कार्यालयासह स्वतःच्या वास्तूत ग्राहक सेवा देत आहेत. धन्वंतरी पतसंस्था यापुढेही आपला सहकारातील आदर्श असाच कायम राखेल असे आश्वासन त्यांनी दिले.
संस्थेचे व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेने रु. २६० कोटीचे पुढे व्यवसाय केला असून यावरुन संस्थेने केलेल्या नेत्रदिपक प्रगतीची प्रचीती येते. एवढेच नाही तर सहकार खात्याचे ऑडीट वर्गवारीत पहिल्यावर्षापासून संस्थेने सर्वोच्च ऑडीट वर्ग ‘अ’ मिळविला आहे. संस्थेकडे रु. १० कोटी ७४ लाख वसूलभागभांडवल, रु. ४१ कोटी ५४ लाख निधी, रु. १५४ कोटी ठेवी, रु. १०७ कोटी येणे कर्ज, रु. १०६ कोटी सुरक्षीत गुंतवणूक आहे. संस्थेने सभासदांना लॉकरसुविधा, सोनेतारण कर्जाची सुविधा, ठेवतारण कॅशकेडीट कर्जाची सुविधा, इ. सुविधा उपलब्ध करुन दिल्या आहेत. तसेच संस्थेने अधुनिक तंत्रज्ञानाचे महत्व लक्षात घेवून सभासद व ग्राहकांसाठी सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केली आहे. सस्थेची स्वतःची वेबसाईटही सुरु केली आहे. जेष्ठ नागरीकांना ज्याप्रमाणे ठेवीवर अर्धा टक्का जादा व्याजदर दिला जातो. तसेच सभासदांचे करीता नवीन वाहन, घरखरेदी, घरबांधणी, प्लॉट खरेदी याकरीता कर्जाचा व्याजदर ८.७५% इतक्या अल्प दराने अर्थपुरवठा संस्था उपलब्ध करुन देत असलेची माहिती त्यांनी दिली.
संस्थेचे मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी सर्व उपस्थितांचे अभिनंदन करुन आभार मानले व यापुढेही अशाच सहकार्याची अपेक्षा व्यक्त केली.
याप्रसंगी संस्थेचे संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सुनिल कोडगुले, अॅड. सुर्यकांत देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे तसेच सर्व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.
