सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » बँकिंग » सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेला रू. पाच कोटी चार लाख निव्वळ नफा व एनपीए शून्य टक्के

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेला रू. पाच कोटी चार लाख निव्वळ नफा व एनपीए शून्य टक्के

सहकार भूषण धन्वंतरी पतसंस्थेला रू. पाच कोटी चार लाख निव्वळ नफा व एनपीए शून्य टक्के

सातारा -सहकार क्षेत्रात सक्षम व आदर्श पतसंस्था म्हणून मा. राज्यपाल यांचे हस्ते “सहकार भूषण” पुरस्कार देवून गौरविलेल्या व गेली ३७ वर्षे अविरत सेवा देत असलेल्या धन्वंतरी नागरी सहकारी पतसंस्थेने गतवर्षीच्या तुलनेत व्यवसायात रू. ६६ कोटीची वाढ करून ३१ मार्च २०२६ अखेर सात शाखांमार्फत रु. ३३७ कोटीचा व्यवसाय करून संस्थेने व्यवसायवाढीचे प्रमाण २४.३४ % इतके ठेवले आहे. पारदर्शक कारभाराच्या जोरावर सन २०२५-२०२६ मध्ये संस्थेने ढोबळ नफा रु. ५ कोटी ८१ लाख मिळविला असून गतवर्षीच्या तुलनेत संस्थेने निव्वळ नफयात रू. २ कोटी ७८ लाखाची वाढ करून मार्च २०२६ अखेर निव्वळ नफा रू. ५ कोटी ०४ लाख मिळविला आहे. गतवर्षीच्या तुलनेत निव्वळ नफावाढीचे प्रमाण १२३.३७% इतके ठेवले आहे. संस्था आर्थिकदृष्ट्या भक्कम होण्याच्या उददेशाने सर्व कायदेशीर तरतूदी पूर्ण करून संस्थेने आपली वसुली प्रकीया परीणामकारक व गतीमान राबवून या वर्षी निव्वळ एनपीएचे प्रमाण शून्य टक्के राखले आहे.

धन्वंतरी पतसंस्थेने आपल्या नियोजनबध्द कामकाजामुळे व सर्व सभासद, कर्जदार, ग्राहक, संचालक, सेवक, हितचिंतक यांचे सहकार्याने हे यश संपादन केले असल्याचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले यांनी सांगितले व याबददल त्यांनी सर्वाचे आभार मानून भविष्यातही असेच सहकार्य मिळावे अशी अपेक्षा व्यक्त केली. ते पुढे म्हणाले की, सेवकांनी व संचालकांनी ग्राहकांकडे प्रत्यक्ष भेटी देवून, फोनव्दारे सतत संपर्क ठेवला. ग्राहकांचेसुध्दा धन्वंतरीवर मनापासून प्रेम असलेमुळे काही कर्जदारांनी स्वयंप्रेरणेने कर्जखाती नियमित केली अशा सर्व कर्जदारांचा आम्हांला अभिमान वाटतो त्यांचे सर्वप्रथम मी संचालक मंडळाचे वतीने अभिनंदन करुन आभार मानतो तसेच व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे, संचालक मंडळ, मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार व त्यांचे सर्व सहकारी अधिकारी वर्ग या सर्वांच्या प्रयत्नांमुळे परिणामकारक होवून संस्थेचा नेट एनपीए शून्य टक्के होवून कर्जवसुली व भरघोस व्यवसायवाढ झाली त्याबदद्ल त्यांचे विशेष अभिनंदन करतो.

संस्थेच्या प्रगतीचा आढावा घेताना ते म्हणाले की, संस्था आपले कामकाज सहकार कायदा, नियम व मंजुर उपविधीमधील तरतूदी व नियामक मंडळाच्या आदेशानुसार करत आहे. सहकार खात्यांचे सर्व निकष, मानांकने इ. ची पूर्तता संस्था प्रत्येक वर्षी करतेच. यावर्षीसुध्दा ऑडीट गुणतक्त्यातील निकषांची पूर्तता संस्थेने पूर्ण केली आहे त्यामुळे शासकीय लेखापरीक्षणानंतर संस्थेस सर्वोच्च असा ऑडीट वर्ग ‘अ’ निश्चितच मिळेल. संस्थेचे संचालक मंडळाने व्यावसायिक व्यवस्थापनाचे धोरण समोर ठेवून वेळोवेळी प्रभावीपणे निर्णय घेतले तसेच सर्व संचालक व कर्मचारी यांना वेळोवेळी प्रशिक्षण देउन संस्थेचा कारभार नियोजनबध्द करुन संस्थेची प्रतिमा समाजात उंचावली आहे. विशेष बाब म्हणजे संस्थेने या आर्थिक वर्षात रू. ८० कोटी ८७ लाख इतक्या रकमेचे विक्रमी व सुरक्षीत सोने तारण कर्जवाटप केले आहे.

 संस्थेच्या मुख्य कार्यालयासह सर्व शाखा संपूर्ण संगणकीकरणासह स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत आहेत. सभासद, संचालक, ठेवीदार, कर्जदार, कष्टाळू सेवक यांचे सहकार्यानेच  आपणांला हे यश प्राप्त झाल्याचे त्यांनी सांगितले व याबद्दल त्यांनी सर्वांचे अभिनंदन केले व आभार व्यक्त केले.

सदरप्रसंगी व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, गतवर्षीच्या तुलनेत ठेवीमध्ये रू. २८ कोटी ६१ लाखाची वाढ होवून ३१ मार्च २०२६ अखेर संस्थेच्या ठेवी रु १८४ कोटी ९२ लाख इतक्या आहेत तसेच गतवर्षीच्या तुलनेत संस्थेने कर्जपुरवठ्यामध्ये रु. ३७ कोटी २९ वाढ होवून मार्च २०२६ अखेर ते रू. १५१ कोटी ७० लाख झाले आहे. संस्थेने सुरक्षीत बँकामध्ये गुंतवणूक करण्यासाठी शासनाच्या नियमांची अंमलबजावणी करून संस्थेच्या गुंतवणूक धोरणाप्रमाणे रू. ९४ कोटीची गुंतवणूक केली आहे. तसेच संस्थेने आपल्या स्वभांडवलाचा पाया दिवसेंदिवस मजबूत व भक्कम केला असून या वर्षाअखेरीस संस्थेने तिचे भांडवल पर्याप्तता प्रमाण (सीआरएआर) ३४.२४% इतके राखले आहे. संस्थेचे स्वनिधी रु. ४८ कोटी ७० लाख व खेळते भांडवल रु. २५७ कोटी ७४ लाख तसेच सरासरी सी.डी. रेशो ६८.९०% इतका असल्याचे त्यांनी सांगीतले. संस्थेने प्रत्येक घटकांत प्रगती केल्याबदद्ल सर्व सहकारी संचालकांचे व सेवक वर्गाचे त्यांनी अभिनंदन करून आभार मानले. संस्थेच्या मुख्य कार्यालयासह ७ शाखांमधून कृती आराखड्यानुसार कामकाज करुन आवश्यक तेवढाच खर्च करुन काटकसरीचे धोरण राबविल्यामुळे व्यवस्थापन खर्चाचे प्रमाण फक्त १.९६% इतके अत्यल्प राखले आहे. संस्था स्थापनेपासून अ वर्ग मिळवत आहे तसेच प्रतिवर्षी संस्था लाभांश देत आली आहे अशा अनेक बाबीमुळे लोकांचा संस्थेवरील विश्वास अधिक दृढ होत आहे. तसेच संस्थेने सीबीएस संगणक प्रणाली कार्यान्वित केल्यामुळे ग्राहक एसएमएस बँकीग, नेट बँकींग, एन.इ.एफ.टी. व आर.टी.जी.एस. सारख्या अत्याधुनिक सुविधांचा लाभ घेत आहेत याचे समाधान वाटते. सहकार खात्याच्या नियामक मंडळाकडून वेळोवेळी मिळणा-या मार्गदर्शक परीपत्रकांचे व नियमांचे पालन करून स्पर्धात्मक बाजारपेठेत संस्था सक्षमतेच्या दृष्टीने संचालक मंडळ सतत जागरूक राहून व्यवस्थापन करत आहे.

यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय यादवराव पवार यांनी पुढील वर्षाचे आर्थिक नियोजन मा. संचालक मंडळाच्या मार्गदर्शनाने अचूक तयार करुन सर्व सेवकांचे सहकार्याने ते परीणामकारक राबविणार असल्याचे सांगून आभार मानले. याप्रसंगी संचालक डॉ. अरविंद काळे, डॉ. शिरीष भोईटे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. नारायण तांबे, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, अॅड. सुर्यकांत देशमुख उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे व कर्मचारी वर्ग उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket