अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सची महागाव शिबिरात दैदिप्यमान कामगिरी

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सची महागाव शिबिरात दैदिप्यमान कामगिरी

साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सची महागाव शिबिरात दैदिप्यमान कामगिरी

सातारा : महागाव येथे दि. २१ ते ३० जुलै दरम्यान आयोजित 22 महाराष्ट्र बटालियन NCC वार्षिक प्रशिक्षण शिबिरात साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या NCC कॅडेट्सनी उल्लेखनीय यश संपादन करत शाळेच्या गौरवशाली परंपरेत आणखी एक मानाचा तुरा रोवला.

या शिबिरात एकूण ३४ शाळांमधील १७४ मुली व ३५१ मुलांनी सहभाग घेतला होता. अत्यंत चुरशीच्या स्पर्धांमध्ये साधना इंग्लिश मीडियम स्कूलच्या कॅडेट्सनी विविध मानाचे पुरस्कार मिळवत आपले कौशल्य सिद्ध केले.

शिबिरातील बेस्ट कॅडेट (मुली) हा मानाचा पुरस्कार सीपीएल श्रेया गाढवे हिने पटकावला. तसेच कॅडेट गौरव जाधव याने फायरिंग स्पर्धेत तृतीय क्रमांक मिळवून शाळेचा गौरव वाढवला. बेस्ट ड्रिल स्पर्धेत प्रथम क्रमांक मिळवत शाळेच्या कॅडेट्सनी आपल्या शिस्त, समन्वय आणि उत्कृष्ट सादरीकरणाची छाप उमटवली.

सांस्कृतिक स्पर्धेतही शाळेच्या विद्यार्थ्यांनी दमदार कामगिरी करत मुलींच्या पथकाने प्रथम क्रमांक, तर मुलांच्या पथकाने द्वितीय क्रमांक मिळवला. विविध स्पर्धांमधील या सातत्यपूर्ण उत्कृष्ट कामगिरीच्या जोरावर शिबिरात सहभागी झालेल्या ३४ शाळांमधून “बेस्ट इन्स्टिट्यूशन” हा अत्यंत प्रतिष्ठेचा पुरस्कार साधना इंग्लिश मीडियम स्कूलने सलग दुसऱ्या वर्षी पटकावला. ही कामगिरी शाळेच्या NCC विभागाच्या सातत्यपूर्ण उत्कृष्टतेची साक्ष देणारी ठरली.

या उल्लेखनीय यशाबद्दल यशोदा शिक्षण संस्थेचे संस्थापक प्रा. दशरथ सगरे, डॉ. अजिंक्य सगरे, कुलपती डॉ. गणेश सुरवसे तसेच शाळेच्या मुख्याध्यापिका श्रीमती वैशाली धुमाळे यांनी सर्व यशस्वी NCC कॅडेट्सचे अभिनंदन करून त्यांच्या उज्ज्वल भवितव्यास शुभेच्छा दिल्या.

विद्यार्थ्यांच्या या दैदिप्यमान यशामागे वर्षभर घेतलेले शिस्तबद्ध प्रशिक्षण, सातत्यपूर्ण सराव आणि योग्य मार्गदर्शन हे महत्त्वाचे कारण ठरले. NCC सेकंड ऑफिसर नीलिका पाटील, प्रशिक्षक सुमित पाटील आणि नृत्य शिक्षिका प्रणिता कदम यांनी विद्यार्थ्यांना कठोर व दर्जेदार प्रशिक्षण देत त्यांच्यात नेतृत्वगुण, शिस्त, आत्मविश्वास आणि राष्ट्रसेवेची भावना विकसित केली. त्यांच्या अथक परिश्रमांमुळे विद्यार्थ्यांनी सलग दुसऱ्या वर्षी “बेस्ट इन्स्टिट्यूशन” पुरस्कारासह अनेक मानाचे पुरस्कार पटकावत शाळेचा, यशोदा शिक्षण संस्थेचा आणि सातारा जिल्ह्याचा नावलौकिक उंचावला.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket