कृषीकन्यांनी साधला मुंढे गावातील शेतकऱ्यांशी संवाद
कराड: मुंढे, ता .कराड महात्मा फुले कृषी विद्यापीठ, राहुरी अंतर्गत कृषी महाविद्यालय, कराड येथील कृषीकन्या सृष्टी कदम,सानिका कांबळे, ऐश्वर्या कुचेकर, भारती माने, नेहा मोरे, यशस्वी नलवडे, पूजा पारसे या मुंढे गावात दाखल झाल्या आहेत.
ग्रामीण कृषी जागृकता आणि कृषी औद्योगिक व कार्यानुभव कार्यक्रमा अंतर्गत शेतकऱ्यांना कृषीकन्यांनी काही प्रात्यक्षिके दाखवले. प्रमुख पीके व त्या वरील रोग, कीटनाशके यांवर मार्गदर्शन, हुमनी प्रादुर्भाव त्याच्यावर उपाय व नवनवीन कृषी संलग्न ॲपची माहिती दिली. तसेच बीज प्रक्रिया आणि कृषी विभागातील विविध योजनांची माहिती दिली व शेतकऱ्यांच्या प्रश्नांचे निरासन करण्याचा प्रयत्न केला .तरी या साठी प्रमुख उपस्थिती म्हणून लाभलेले मान्यवर श्री. सुशांत भोसले मंडळ कृषी अधिकारी, कराड, श्री विनोद पुजारी कृषी पर्यवेक्षक, श्रीमती धनश्री होवाळ कृषी सहाय्यक, मुंढे, श्रीमती रुपाली भांदिर्गे कृषी सहाय्यक, श्री राहुल पाटील कृषी सहाय्यक व इतर माननीय सदस्य या उपक्रमासाठी कृषी महाविद्यालयाचे प्राचार्य तथा सहयोगी अधिष्ठाता डॉ. शिवाजी पाटील, अधिष्ठाता प्रतिनीधी डॉ. एस. व्ही बुलबुले,केंद्रप्रमुख डॉ. राणी निंबाळकर, कार्यक्रम समन्वयक डॉ. राजेंद्र हसुरे,कार्यक्रम अधिकारी डॉ. अर्चना ताठे आणि डॉ. सुनिल अडांगळे,विषयतज्ज्ञ डॉ. स्नेहल गाडेवाड , डॉ . नंदकिशोर टाले यांचे मार्गदर्शन लाभले.