“रयत”चा १०५ वा वर्धापनदिन
सातारा -प्रतिनिधी रयत शिक्षण संस्थेची स्थापना १९१९ मध्ये काले येथे कर्मवीर भाऊराव पाटील यांनी केली होती.या संस्थेचा शुक्रवार दि.४ ऑक्टोबर रोजी १०५ वा वर्धापनदिन सोहळा साजरा होत आहे. या सोहळ्यासाठी प्रमुख पाहुणे म्हणून माजी शिक्षण संचालक डॉ.वसंत काळपांडे उपस्थित राहणार आहेत, अशी माहिती सचिव विकास देशमुख यांनी दिली.रयत शिक्षण संस्थेचा वर्धापन दिनानिमित्त समाधी परिसरात होणाऱ्या मुख्य कार्यक्रम संस्थेचे चेअरमन चंद्रकांत दळवी यांच्या अध्यक्षतेखाली दुपारी ३ वा. होणार असून यावेळी व्हा.चेअरमन ॲड.भगीरथ शिंदे, संघटक डॉ. अनिल पाटील आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या कार्यक्रम उपस्थित राहण्याचे आवाहन सचिव विकास देशमुख यांनी केले आहे.




