Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » रशियन विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू

रशियन विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू 

रशियन विमानाचा लँडिंगदरम्यान अपघात; सर्व ५० प्रवाशांचा मृत्यू 

 चीनच्या सीमेलगत असलेल्या रशियाच्या पूर्वेकडील भागात ५० प्रवाशांना घेऊन जाणारे एक प्रवासी विमान कोसळले असून, सर्व प्रवासी मृत्युमुखी पडल्याची भीती व्यक्त करण्यात येत आहे. या घटनेची माहिती रॉयटर्स वृत्तसंस्थेने दिली आहे.

उड्डाणाच्या दरम्यानच विमान वाहतूक नियंत्रण कक्षाचा विमानाशी संपर्क तुटला आणि काही वेळातच बचाव पथकांना घटनास्थळी विमानाच्या जळालेल्या अवशेषांचे काही भाग आढळून आले. स्थानिक आपत्कालीन सेवा मंत्रालयाच्या माहितीनुसार, अंगारा एअरलाइन्सचे An-24 हे विमान अमूर प्रदेशातील टिंडा शहराजवळ पोहोचत असतानाच रडारवरून बेपत्ता झाले.प्राथमिक विश्लेषणावरून असे दिसून येते की, कमी दृश्यमानतेमुळे लँडिंग करताना पायलटची चूक झाल्यामुळे हा विमान अपघात झाला असण्याची शक्यता आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket