Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » ऑटोमोबाईल » राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद(आबा) जाधव -पाटील

राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद(आबा) जाधव -पाटील 

राज्यातील शेतकऱ्यांना 535 कोटींची पीक नुकसान भरपाई- मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद(आबा) जाधव -पाटील 

सातारा प्रतिनिधी | नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्याच्या दृष्टीने राज्य शासनाने महत्त्वपूर्ण पाऊल उचलले आहे. याअंतर्गत ५ लाख ३० हजार ४५ शेतकऱ्यांना ५३५ कोटी ६५ लाख ७४ हजार ८९३ रुपयांची मदत वितरित करण्यात आली आहे. मदतीची ही रक्कम थेट आपद्ग्रस्त लाभार्थी शेतकऱ्यांच्या बँक खात्यात जमा केल्याची माहिती मदत व पुनर्वसन मंत्री मकरंद जाधव-पाटील यांनी दिली.

ना.मकरंद पाटील यांनी आपल्या फेसबुक अकाऊंटवरून एक व्हिडीओ शेअर करत मदतीबाबत महत्वाची माहिती दिली आहे. त्यांनी म्हटले आहे की, नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेतकऱ्यांना दिलासा देण्यास शासन नेहमीच प्राधान्य देत असून विविध नैसर्गिक आपत्तींमुळे बाधित झालेल्या शेती पीक नुकसानीपोटी मार्च २०२३ पासून ९ हजार ३०७ कोटी रुपये इतकी रक्कम डीबीटीद्वारे शेतकऱ्यांच्या आधार संलग्न बँक खात्यांमध्ये थेट जमा करण्यात आली आहे.

 

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket