वाठार निंबाळकर येथे 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बीज उत्सव व पालखी सोहळा संपन्न होणार
फलटण प्रतिनिधी -वाठार निंबाळकर येथे 20 जानेवारी रोजी धर्मनाथ बीज उत्सव व पालखी सोहळा संपन्न होणार आहे, ओम चैतन्य सद्गुरु श्री कानिफनाथ महाराज मठ ववाठार निंबाळकर तालुका फलटण येथे धर्मनाथ बीज उत्सव व पालखी सोहळा मंगळवार 20 जानेवारी 26 रोजी आयोजित केला असल्याची माहिती मठाधीपती श्री शिवेंद्रनाथ महाराज यांनी दिली, दरम्यान मंगळवारी 20 जानेवारी सकाळी सात ते साडेसात मठातील देवतांची पूजा, साडेसात ते आठ सद्गुरु पाद्यपूजा व अभिषेक, यानंतर आलेल्या भाविक भक्तांना चहा व नाश्ता ,,सकाळी नऊ ते बारापर्यंत विधिवत नाथपंथीय होम हवन, यावेळी ओम चैतन्य कानिफनाथ भजनी मंडळ वाठार निंबाळकर यांचा कार्यक्रम, दुपारी बारा वाजता नवनाथांची महाआरती, दुपारी साडेबारा ते तीन या वेळेत भाविक भक्तांसाठी व ग्रामस्थांसाठी महाप्रसाद, याच दरम्यान नवनाथांचा शाहिरी कार्यक्रम, तदनंतर चार वाजता सद्गुरू पालखी व मिरवणूक सोहळा आयोजित करण्यात आला आहे.
संध्याकाळी साडे सात ते आठ नवनाथांची महाआरती, त्यानंतर ओम भजनी मंडळ वाठार निंबाळकर यांचा भजन व गायन सोहळा होणार असून या कार्यक्रमासाठी भाविक भक्तांनी उपस्थित राहावे असे आवाहन व वाठार निंबाळकर धर्मनाथ बीज उत्सव समिती व वाठार निंबाळकर ग्रामस्थ यांनी केले आहे.




