रोहास संघटना डॉक्टरांच्या हक्कांसाठी कायम तत्पर राहील : डॉ मनोहर ससाणे
रुरल हॉस्पिटल ओनर्स अँड जनरल प्रॅक्टिशनर्स असोसिएशन (रोहास), जिल्हा सातारा यांच्या वतीने आयोजित ROHASCON 2026 ही वार्षिक वैद्यकीय परिषद रविवार, दिनांक 18 जानेवारी 2026 रोजी महाबळेश्वर येथील दि ग्रँड लीगसी हॉटेलमध्ये उत्साहात पार पडली.
या परिषदेचे उद्घाटन प्रमुख पाहुणे डॉ. परवेज ग्रँट, प्रसिद्ध कार्डिओलॉजिस्ट, रुबी हॉल क्लिनिक, पुणे यांच्या शुभहस्ते करण्यात आले.परिषदेत वैद्यकीय क्षेत्रातील अद्ययावत व महत्त्वाच्या विषयांवर डॉ. अमोल ढवळे, डॉ. रामप्रसाद धरणगुट्टी, डॉ. आशिषकुमार बनपूरकर, नवी मुंबई येथील एस.डी. इन्फ्रा बिल्डर्स अँड डेव्हलपर्स चे डायरेक्टर श्री. किशोर बोराटे, तसेच डॉ. धैर्यशील कणसे, डॉ. आशिष जळक, डॉ. कपिल जगताप, डॉ. श्रीकांत दलाल, डॉ. सिद्धेश त्रिंबके, डॉ. गौरव जसवाल यांनी मार्गदर्शक व्याख्याने दिली.
या व्याख्यानांमुळे उपस्थित डॉक्टरांना आधुनिक वैद्यकीय तंत्रज्ञान व उपचारपद्धतींची सखोल माहिती मिळाली. रोहासकॉन 2026 मुळे सहभागी डॉक्टरांना नवी दिशा व नवी ऊर्जा मिळाल्याची भावना व्यक्त करण्यात आली.
या यशस्वी परिषदेचे आयोजन रोहासचे अध्यक्ष डॉ. मनोहर ससाणे यांच्या नेतृत्वाखाली करण्यात आले. यावेळी बोलताना डॉ. ससाणे म्हणाले की, रोहासची स्थापना डॉक्टरांचे हक्क, सन्मान व संरक्षण यासाठी करण्यात आली असून सामाजिक बांधिलकी जपत समाजसेवेचे कार्य सातत्याने केले जात आहे.
संघटनेमार्फत अनेक मोफत आरोग्य तपासणी व उपचार शिबिरे राबविण्यात आली असून, करोना काळातही रुग्णसेवा करण्यात आली. ग्रामीण भागातील डॉक्टरांच्या अडचणी लक्षात घेऊन त्यावर योग्य तोडगा काढण्यात आला आहे. भविष्यात पेपरलेस दवाखाने, मेडिकल टुरिझम तसेच डॉक्टरांच्या विविध कलागुणांच्या विकासासाठी उपक्रम राबविण्यात येणार असल्याचे त्यांनी सांगितले.
या परिषदेसाठी मार्गदर्शक डॉ. सुधाकर बेंद्रे, गुरुवर्य डॉ. माणिकराव जाधव, उपाध्यक्ष डॉ. प्रताप गोवेकर, सचिव डॉ. सचिन गुरव, उपसचिव डॉ. श्रीकांत कदम, कोषाध्यक्ष डॉ. विश्वजीत बाबर, सहकोषाध्यक्ष डॉ. विकास फरांदे, समन्वयक डॉ. शंतनू पवार तसेच संपूर्ण रोहास कार्यकारिणीने विशेष परिश्रम घेतले.सातारा जिल्ह्यातील मोठ्या संख्येने डॉक्टरांनी उपस्थिती लावून परिषदेला भरघोस प्रतिसाद दिला.

डॉ ग्रँट यांचा सत्कार करताना डॉ मनोहर ससाणे, डॉ माणिक जाधव, डॉ अमोल ढवळे, डॉ विश्वजीत बाबर, डॉ विकास फरांदे, डॉ शंतनु पवार, डॉ सचिन गुरव, डॉ श्रीकांत कदम, डॉ सुधाकर बेंद्रे, डॉ प्रताप गोवेकर



