अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऋतुजाताई शिंदे यांची तात्काळ धाव; पिराचीवाडी दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांचा निधी मंजूर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऋतुजाताई शिंदे यांची तात्काळ धाव; पिराचीवाडी दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांचा निधी मंजूर

विद्यार्थ्यांच्या सुरक्षेसाठी ऋतुजाताई शिंदे यांची तात्काळ धाव; पिराचीवाडी दत्तनगर शाळेसाठी १५ लाखांचा निधी मंजूर

वाई- वाई तालुक्यात झालेल्या मुसळधार पावसामुळे दत्तनगर (पिराचीवाडी) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेवर मोठे संकट ओढवले आहे. शाळेच्या पाठीमागील डोंगराचा उतार मोठ्या प्रमाणात खचल्याने मातीचा भराव आणि दगड-गोटे थेट संरक्षण भिंतीलगत येऊन पोहोचले. त्यामुळे विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेचा गंभीर प्रश्न निर्माण झाला होता ग्रामस्थ व पालकांमध्ये चिंतेचे वातावरण पसरले होते 

दरड कोसळल्यामुळे शाळेतील विद्यार्थ्यांच्या शौचालयाचे तसेच किचनशेडचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे. आणखी पाऊस झाल्यास डोंगराचा आणखी भाग खचून मोठी दुर्घटना घडण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर शाळेच्या पाठीमागे मजबूत संरक्षण भिंत उभारणे, खचलेली माती व दगड-गोटे तातडीने हटविणे आणि नुकसानग्रस्त शौचालय व किचनशेडची युद्धपातळीवर दुरुस्ती करावी, अशी मागणी ग्रामस्थ यांनी प्रशासनाकडे केली होती.

या गंभीर परिस्थितीची तात्काळ दखल घेत बावधन जिल्हा परिषद गटाच्या जिल्हा परिषद सदस्या तथा महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांनी घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीची पाहणी केली. विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेला सर्वोच्च प्राधान्य देत त्यांनी जिल्हा परिषद निधीतून तातडीने १५ लाख रुपयांचा निधी मंजूर केला जाईल असे आश्वासित केले.

या निधीतून संरक्षण भिंतीसाठी ९ लाख रुपये, शौचालयाच्या दुरुस्तीसाठी ३ लाख रुपये आणि किचनशेडच्या पत्र्यांसाठी ३ लाख रुपये मंजूर करण्यात आले असून संबंधित कामे तातडीने सुरू करण्याचे आदेशही त्यांनी दिले. तसेच विद्यार्थ्यांच्या शिक्षणात कोणताही अडथळा येऊ नये यासाठी त्यांची तात्पुरती व्यवस्था मंदिरामध्ये करण्याचा महत्त्वपूर्ण निर्णय घेण्यात आला.

यावेळी गटशिक्षणाधिकारी किरणकुमार मोरे, अभियंता केदार गायकवाड, चंद्रकांत मांढरे, सर्जेराव कोंडके, सामाजिक कार्यकर्ते युवराज कोंढाळकर, शाळेचे शिक्षक, ग्रामसेविका धायगुडे मॅडम, शाळा व्यवस्थापन समितीचे पदाधिकारी तसेच ग्रामस्थ उपस्थित होते.विद्यार्थ्यांच्या सुरक्षिततेसाठी वेळेवर घेतलेला निर्णय, तातडीने मंजूर केलेला निधी आणि कामे युद्धपातळीवर सुरू करण्याचे आदेश यामुळे ग्रामस्थांनी महिला व बालकल्याण समितीच्या सभापती ऋतुजाताई शिंदे यांच्या तत्पर कार्यपद्धतीचे कौतुक करत समाधान व्यक्त केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket