कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विषयावर “चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेस प्रतिसाद
वाई -स्तंभ कॉन्झर्वेशन स्टुडिओ मुंबई व कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन वाई यांचे वतीने कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विषयावर “चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेचे शुक्रवार दि. २९ नाेव्हेंबर राेजी यशस्वी आयाेजन करण्यात आले.
“चला सुरुवात करूया” या विशेष कार्यशाळेचे शुक्रवार दि. २९ नाेव्हेंबर राेजी वाई येथील लाेकमान्य टिळक वाचनालय येथे सकाळी १० वाजता मुंबई येथील स्तंभ काँझर्वेशन स्टुडिओच्या वास्तुविशारद पूर्वी पाटील,श्री अजय नायर व त्यांचे सहकारी यांचे हस्ते व कृष्णा नदी सेवाकार्याचे पदाधिकारी यांचे उपस्थितीत कृष्णामाईच्या प्रतिमेस पुष्पहार घालून कार्यक्रमास सुरुवात झाली.
या कार्यशाळेत कृष्णा नदीच्या संरक्षण, आणि संवर्धन यावर विचार मंथन करताना स्तंभ कॉन्झर्वेशन स्टुडिओच्या सर्वेसर्वा पूर्वा पाटील यांनी सद्य स्थितीत व त्यावर पुरातत्व खात्याच्या नियमावलीनुसार बदलणारी स्थिती कशी असेल याची चित्रफीत दाखवून त्याची माहिती सांगितली.कृष्णा नदी फक्त आपली नैसर्गिक संपत्ती नाही, तर आपल्या इतिहासाचा आणि सांस्कृतिक वारशाचा एक महत्त्वाचा भाग आहे. परंतु, बदलत्या काळानुसार आपण या नात्याला कितपत जपले आहे? आज नदी आणि पर्यावरणासमोरील आव्हाने किती गंभीर आहेत, आणि आपण या समस्यांवर कोणते ठोस उपाय शोधू शकतो, हे ठरवण्याची वेळ आली आहे. वाई शहराला कृष्णा नदीने केवळ पाणीपुरवठाच नाही, तर परंपरा, निसर्गसौंदर्य आणि सामाजिक जीवनाची ओळख दिली आहे. ही नदी आपल्यासाठी कृष्णा माई” आहे, परंतु आज ती आपल्या सहकार्याची, संवर्धनाची आणि जपणुकीची वाट पाहत आहे.आपल्याला हे लक्षात घ्यावे लागेल की बदलत्या काळात नदीच्या अस्तित्वाला अनेक प्रकारच्या आव्हानांचा सामना करावा लागतो आहे. शहरीकरण, प्रदूषण, आणि विसरलेल्या परंपरा यामुळे नदीची स्थिती दिवसेंदिवस बिघडत आहे. या पार्श्वभूमीवर वाईकर नागरिकांनी,प्रशासनाने किती जागरूक राहून या वारसाहक्काने मिळालेल्या अनमोल ठेव्याचे संवर्धन,जतन आपण केलेच पाहिजे व हा ठेवा पुढील पिढीस हस्तांतरित केला पाहिजे. नदीपात्रात अनेक प्रकारचे कुंड व पाणी वाहते राहावे यासाठीची रचना जवळपास तीनशे वर्षा पूर्वी केली ती लुप्त होण्याच्या मार्गावर असताना कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशनच्या आठ वर्षे अथक व सातत्यपूर्ण कामामुळे आज आपण ती पाहू शकतो, त्याचंच संवर्धन अर्थात डागडुजी करून जतन कसे करावे याच हेतून आजची ही संवाद कार्यशाळा. आपल्या नदीसाठी काहीतरी करण्याची! आज आपण “शोध, संवाद, विकास” या त्रिसूत्रीच्या आधारे काम करणार आहोत.
या कार्यशाळेमध्ये प्रामुख्याने आपल्या नदीचा सांस्कृतिक, ऐतिहासिक आणि सामाजिक वारसा नव्याने समजून घेऊन तसेच नागरिक, हितधारक आणि शासकीय यंत्रणा यांच्यातील दुवा सांधून एकमेकांचे दृष्टिकोन समजून घेऊन योग्य आणि परिणामकारक उपाय शोधून त्यावर कृती आराखडा तयार करण्यात आला आहे त्याची अंमलबजावणी करू असे फौंडेशनचे अध्यक्ष प्राध्यापक डॉ.नितिन कदम सर यांनी आपल्या प्रस्तावीकात नमूद केले.
या सत्रामध्ये धोम गावचे ग्रामपंचायत सदस्य, नागरिक,वाईतील अनेक सामाजिक संस्था,सामाजिक कार्यकर्ते, लोकप्रतिनिधी, कृष्णा माई संस्थानचे पंच,नागरिक उपस्थीत राहून चर्चेत सहभागी झाले. यात नगरपालिका प्रशासनाचे वतीने श्री सदानंद भोपळे यांनी सांडपाणी निस्सारण प्रकल्पाच्या कामाची सुरुवात झाली असून त्याचे विवेचन करून नदी संवर्धन कार्यात यापुढे सक्रिय सहभाग असेल याची ग्वाही दिली.निवृत्त अभियंता श्री मेहंदळे(मुंबई) यांनी आपल्या व्यक्तिगत अनुभवांनी,
कल्पनांनी आणि चर्चेतून नदीच्या संरक्षणासाठी एक ठोस दिशादर्शक आराखडा तयार करून त्याची सुनियोजित आखणी करण्याची हीच वेळ असून त्यात नागरिकांचा सहभाग मोलाचा असावा यासाठी ज्या ज्या तांत्रिक बाबींची आवश्यकता लागेल तिथं मी स्वतः देत जाईन कारण घेतलेल्या ज्ञानाचा उपयोग अशा विधायक कार्यास लागणार असेल तर यासारखं दुसरं भाग्य नसेल.
नुसत्या समस्या न मांडता त्यावर उपाय शोधून त्याची अंमलबजावणी करण्यासाठीही पुढाकार घेणार असे मत राष्ट्र सेविका समितीच्या सौ मनिषा घैसास,सेवा फौंडेशनच्या डॉ सौ शस्मिता जैन यांनी व्यक्त केले.नदी स्वच्छता, घाटांची,मंदिरांची डागडुजी हे आता कोणतेही कारण न सांगता एकत्रितपणे आपण सर्वांनी मिळून करुयात,नवनवीन तांत्रिक बाबींचा,तज्ज्ञांचा सल्ला घेऊन शहरातील सर्व स्थरावर आपण कार्यरत राहून आपल्या शहरात पर्यटन कसे वाढेल,स्वच्छ, सुंदर व वाहती नदी कशी ठेवता येईल यासाठी स्तंभ कॉन्झर्वेशन स्टुडिओच्या पथदर्शक नियमावलीनुसार कार्यरत राहण्याचे अभिवचन नगरसेवक श्री प्रदीप चोरगे,श्री विजय ढेकाणे,श्री धनंजय मलटने, सिद्धार्थ ढवण यांनी आपले विचारआपल्या मनोगतातून व्यक्त केले.
जिथं कृष्णा व कमंडलू नदीचा संगम झाला,जिथं पुरातन व वास्तुकलेचा उत्कृष्ट नमुना असणारे श्री नृसिंह मंदिर असल्याने प्रसिद्ध असलेले धोम गाव,मात्र धरण होऊन मूळ नदीपात्र बंद होऊन तिथून होणारा पाणी प्रवाह खंडित झालेने नदीपात्रात मोठ्या प्रमाणात जलपर्णीचे साम्राज्य होऊन पूर्ण नदीपात्र सध्या हरवून बसले असून त्यातून अनेक मानवास हानिकारक प्रदूषण निर्माण झाले असून ते गावकऱ्यांचे आरोग्यास हानिकारक ठरले आहे,यावर स्तंभ फौंडेशन व कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशन यांनी मिळून ठोस उपाययोजना करून यातून नदीपात्र मोकळं व वाहत करावं अशी मागणी केली व त्यास लागणारे सर्व सहकार्य आम्ही ग्रामस्थ करू असे आश्वासन श्री अशोक मराठे,महादेव गायकवाड, डॉ अविनाश नायकवडी यांनी दिले.
प्रारंभी मान्यवरांचे स्वागत करून सेवाकर्यांचे खजिनदार व नगरसेवक श्री भारत खामकर यांनी प्रास्ताविक करून आठ नऊ वर्षाच्या कामाचा आढावा मांडला व पुरातन ठेव्याचे संवर्धन।याचसाठी कार्यरत फौंडेशन नुसार नदी व घाट स्वच्छता तर रविवारी सातत्याने करीत आहेत हीच वेळ आहे आपण सर्वानी एकत्र येऊन कृष्णा नदीच्या उज्ज्वल भविष्याचा विचार करू. तिच्या अस्तित्वासाठी सकारात्मकता आणि दृढ संकल्पाने काम करण्याची.ही नदी आपल्यासाठी आहे, आणि आपण तिच्यासाठी काहीतरी करणे ही आपल्या पुढच्या पिढ्यांसाठीदेखील एक मोठी देणगी असेल असे विचार मांडले.
आपण आज स्तंभ फौंडेशन स्टुडिओ व कृष्णा नदी सेवाकार्य फौंडेशनच्या या कार्यशाळेत एकत्र येऊन काम करण्याची तयारी दर्शवली त्याबद्दल स्तंभ फौंडेशन, वाईतील सामाजिक संस्था,कार्यकर्ते, नागरिक व नगरपालिका प्रशासन यांनी पुढेही असेच भरीव सहकार्य करावे व आपण मिळुन सारेजण *चला करुयात सुरुवात* या कृष्णामाई च्या संवर्धन कामात सहभागी होऊयात या आपल्या दृढनिश्चया बद्दल आपल्या सर्वांचे मनःपूर्वक आभार संस्थेचे सचिव काशिनाथ शेलार यांनी मानले.सौ तनुजा इनामदार, सतीश शेंडे,राजीव कानडे, सौ ज्योती गांधी,मकरंद मुळ्ये, मिलिंद पुरोहित मान्यवर उपस्थित होते. संवाद कार्यशाळा यशस्वी करण्यासाठी सौ व श्री गिरीश जाधव,अतुल वाईकर, सौ अपर्णा वाईकर,मेजर समीर पवार,तुषार घाडगे,अमित सोहनी, सुधीर क्षीरसागर,अमोल मुळीक, कुमार पवार,सचिन गायकवाड, चंद्रशेखर वणारसे, श्रीमती सारिका गवते,भवरलाल ओसवाल तसेच इतर सर्व सेवेकर्यांनी परिश्रम घेतले.