Home » ठळक बातम्या » सातारा शहरात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक

सातारा शहरात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक 

सातारा शहरात रुग्णाच्या मृत्यूनंतर नातेवाईक आक्रमक 

सातारा -सातारा शहरातील अक्षय नलावडे (वय २६ वर्षे) या युवकाच्या मृत्यूप्रकरणी मंगलमूर्ती हॉस्पिटलमधील डॉक्टर भूषण पाटील यांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. उपचार करण्यामध्ये डॉक्टरांनी अक्षम्य हलगर्जीपणा केल्यामुळे युवकाचा मृत्यू झाल्याचा आरोप करून नातेवाईकांनी तसेच नागरिकांनी हॉस्पिटलसमोर मोठी गर्दी केली होती. 

छातीत दुखत असल्याने उपचार घेण्यासाठी जिल्हा परिषदेसमोरील मंगलमूर्ती हॉस्पिटलमध्ये अक्षय नलावडे हा युवक दाखल झाला होता. यावेळी त्याची अँजिओग्राफी करून रिपोर्ट नॉर्मल आल्याचे सांगून देखरेखीखाली दोन दिवस हॉस्पिटलमध्ये ठेवून घेतल्यानंतर त्यास घरीपा ठवण्यात आले. मात्र पुन्हा असह्य वेदना होत असल्याने त्यास आज गुरुवार दि. २ जानेवारी रोजी सकाळी आठ वाजता त्याचे कुटुंबीय मंगलमूर्ती हॉस्पिटल मध्ये घेऊन आले. नातेवाईकांनी “अक्षय यास हार्ट अटॅक आला आहे. कृपया लवकर उपचार सुरू करा, ” अशी विनवणी करूनही तेथे उपस्थित असलेल्या डॉक्टरांनी हलगर्जीपणा केला असल्याचा आरोप नातेवाईकांनी केला.त्यामुळे अक्षयची प्रकृती खूपच खालावली. काही मिनिटात त्याचा मृत्यू झाल्याचे डॉक्टरांनी जाहीर केले. तद्नंतर हाता

तोंडाशी आलेला व घरातील कमावता मुलगा डॉक्टरांच्या हलगर्जीपणामुळे आणि उपचारातील अक्षम्य वेळकाढू पणामुळे मृत झाल्याने नातेवाईकांनी हॉस्पिटलच्या आवारात एकच हंबरडा फोडला.दरम्यान, हा प्रकार समजताच सातारा शहर पोलीस ठाण्याचे पोलीस कर्मचारी रुग्णालयात दाखल झाले व त्यांनी परिस्थिती समजून घेत शांतता प्रस्थापित करण्याचा प्रयत्न करून योग्य ती कारवाई करण्यात आली.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे देण्यात आले निवेदन 

Post Views: 122 जन सुरक्षा विधेयक विधिमंडळात तात्काळ मागे घेणे विषयी जिल्हाधिकारी सातारा यांना अँटी करप्शन ऑफ ब्युरो इंडिया तर्फे

Live Cricket