रवींद्र जगताप इंटकचे अध्यक्ष
सातारा :काँग्रेस प्रणीत, इंडियन नॅशनल ट्रेड युनियन काँग्रेस (इंटक) संघटनेच्या पश्चिम महाराष्ट्र राज्य अध्यक्षपदी रवींद्र लाला जगताप यांची निवड झाली आहे. संघटनेचे राष्ट्रीय अध्यक्ष संजीव रेड्डी यांनी ही निवड केली आहे. संघटनेने आपल्यावर दिलेली जबाबदारी यशस्वीपणे पार पाडत पश्चिम महाराष्ट्र कार्यक्षेत्रातील संघटित व असंघटित क्षेत्रातील कामगारांच्या न्याय्य हक्कासाठी व संघटना वाढीसाठी आपण प्रयत्न करणार असल्याचे नूतन अध्यक्ष रवींद्र जगताप यांनी सांगितले.
श्री. जगताप यांच्या निवडीबद्दल प्रदेशाध्यक्ष डॉ. कैलास कदम, उपाध्यक्ष बाबासाहेब चव्हाण, महिला सेल कार्याध्यक्ष अनिता गोरे, महिला आघाडी अध्यक्षा प्रज्ञाताई कांबळे, अॅड. अप्पासाहेब घोरपडे तसेच. रवींद्र जगताप हे गौरीशंकर नॉलेज सिटी चे कायदेशीर मॅनेजर असून त्यांच्या झालेल्या निवडीबद्दल संस्थेचे अध्यक्ष मदनराव जगताप व मान्यवरांनी अभिनंदन केले