कराडमध्ये रेशनिंग धान्याचा काळाबाजार उघड तब्बल 11 टन अवैद्य स्वस्त धान्याचा साठा जप्त
कराड -पुरवठा शाखेची मोठी कारवाई कराड येथील वाखाण रोड येथे 11 टन अवैध स्वस्त धान्याचा मोठा साठा जप्त केला असून यामध्ये जवळजवळ 200 हून अधिक गोण्या केल्या जप्त, कराड पुरवठा शाखेची मोठी कारवाई पुरवठा शाखेच्या पुरवठा निरीक्षण अधिकारी साहीला नायकवडे यांनी केले ही कारवाई केली.
रविवार दि 29 मार्च रोजी सकाळी नऊ वाजता कराड वाकड रोड येथे असणाऱ्या शेडमध्ये सार्वजनिक वितरण व्यवस्था अंतर्गत होणारा गहू व तांदळाचा मोठा साठा असल्याची माहिती मिळाली त्यानुसार पुरवठा निरीक्षण अधिकारी साहिला नायकवडे व त्यांच्या पथकाने या ठिकाणी छापा टाकून तब्बल 11 टन अवैध स्वस्त धान्याचा साठा जप्त केला हा साठा करणाऱ्या रेशनिंग दुकानदार व्यक्तीवर कारवाई करून त्यास ताब्यात घेण्यात आले व सदर साठा जप्त करण्यात आला असल्याची माहिती साहिला नाईकवडे यांनी दिली.




