रस्त्यालगत असणाऱ्या गावांचा विचार व्हावा-आ. शशिकांत शिंदे
आ.शशिकांत शिंदे यांची मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी घेतली दखल
शिवथर.(सुनिल साबळे) सातारा लोणंद रस्त्यावर ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले होते याबाबत मीडियाने आवाज उठवला होता. याचीच दखल घेऊन आमदार शशिकांत शिंदे यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये आवाज उठवला. तसेच रस्त्यालगत असणाऱ्या गावांचा विचार व्हावा याबाबत बांधकाम मंत्री शिवेंद्रराजे भोसले यांनी गांभीर्याने दखल घेतल्याचे दिसून आले.
आमदार शशिकांत शिंदे सर्वसामान्य जनतेचा नेता असेच म्हणावे लागेल मीडियाच्या माध्यमातून बऱ्याचदा सर्वसामान्य जनतेसाठी आवाज उठवला जातो. मध्यंतरीच्या काळामध्ये एका वृत्तपत्रांमध्ये सातारा लोणंद रस्त्याबाबत बातमी प्रसिद्ध झाली होती इतर कोणत्याही राजकीय नेत्याने याकडे गांभीर्याने पाहिले नव्हते परंतु आमदार शशिकांत शिंदे यांनी याबाबत आवाज उठवून हिवाळी अधिवेशनामध्ये लक्ष वेधले होते याबाबत बांधकाम मंत्री शिवेंद्र सिंह राजे भोसले यांनी सातारा लोणंद रस्ता वाढी संदर्भात योग्य निर्णय घेतला जाईल असे सांगितले तसेच शिवथर वडूथ आरळे ही गावे रस्त्यालगत असल्याने मोठ्या प्रमाणात घरांचे नुकसान होऊ शकते याबाबत देखील आमदार शशिकांत शिंदे यांच्याबरोबर बैठक घेऊन निर्णय घेतला जाईल असेही नामदार शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले.
सातारा आणि कोरेगाव दोन्ही मतदार संघ आमच्या दोघांचे आहेत. त्यामुळे लोणंद ते सातारा रस्ता वाढी संदर्भात ज्या समस्या किंवा अडचणी निर्माण होतील त्याबाबत आमदार शशिकांत शिंदे यांना घेऊन तोडगा काढला जाईल असेही नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांनी हिवाळी अधिवेशनामध्ये सांगितले. त्यामुळे आमदार शशिकांत शिंदे व नामदार शिवेंद्रसिंह राजे भोसले यांच्याकडे सर्वच आमदारांनी लक्ष वेधले.
