Post Views: 22
रंगीबेरंगी रेनकोट, छत्र्यांनी बाजार सजला
सातारा: आपली छत्री, रेनकोट इतरांपेक्षा वेगळी आणि आकर्षक कशी दिसेल याकडे विशेष लक्ष देत नागरिक छत्री, रेनकोट खरेदी करत असून त्यांच्या पसंतीला पडणाऱ्या विविध रंगी छत्र्यांनी, रेनकोट नी बाजार सजले आहेत. विशेषकरून पोवईनाका, सातारा एसटी स्टँड परिसर, राजवाडा, खणआळी या भागांतील बाजारपेठेत व दुकानांमध्ये ग्राहकांची गर्दी दिसत आहे.
बाजारपेठा पावसाळी वस्तूंनी सजू लागल्या आहेत. या वर्षीही ग्राहकांच्या पसंतीस उतरतील अशा वस्तू व्यावसायिकांनी बाजारात उपलब्ध केल्या आहेत. पावसाचे आगमन यामुळे दरवर्षी हा हंगाम व्यावसायिकांना लाखो रुपयांचे उत्पन्न देऊन जातो. जेंट्स आणि लेडीज रेनकोटमध्ये पॅंट-शर्ट, पॅराशूट नायलॉन, ट्रान्सपरंट रेनकोट बाजारात दाखल झाले आहेत. मॉडर्न छत्र्या सगळीकडे उपलब्ध आहेत.
