रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 ला साताराकर नागरिकांचा थंड प्रतिसाद
सातारा -रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 या भव्यदिव्य गृहप्रदर्शनाचा प्रारंभ झाला असला तरी या एक्स्पोला म्हणावी इतकी गर्दी नसल्याचे दिसून येत आहे. रचना प्रॉपर्टी एक्स्पो 2024 मध्ये अपार्टमेंट्स, बंगलो, रो- हाऊस ,प्लॉट्स तसेच इलेक्ट्रॉनिक्स, होम डेकोर, बिल्डिंग मटेरिअल, सोलर प्लांट आणि बँकिंग सेवा अशा सर्व सुविधा तुम्ही एकाच ठिकाणी पाहता येत असल्या तरी. सातारकरांनी याकडे पाठ फिरवल्याचे दिसून येत आहे.
मुळातच सातारा शहरातील वाढत्या घरांच्या किमती, वाढती महागाई अशातच सर्वसामान्य ग्राहक दोन वर्षातून होणाऱ्या रचना प्रॉपर्टी एक्स्पोकडे जाण्यास इच्छुक नसल्याचे दिसून येत आहे.




