नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ शेखर गोरे १ सप्टेंबरला शिवसेनेत प्रवेश करणार; माण-खटावच्या राजकारणात नवे समीकरण राष्ट्रीय महामार्गावर विदेशी दारूची अवैद्य वाहतुक करणारे दोन जण ताब्यात ६ लाख १९ हजारांचा मुद्देमाल जप्त खंडाळा पोलीस स्टेशनची धडाकेबाज कारवाई महाबळेश्वर: एम. ई. एस. इंग्लिश मीडियम हायस्कूलच्या विद्यार्थिनींनी नगराध्यक्ष सुनील शिंदे यांना बांधली राखी; रक्षाबंधन सोहळा उत्साहात संपन्न केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन जि. प. सदस्या कविता ओंबळे यांची मागणी; जावळीतील शासकीय कार्यालयांत बाळासाहेब ठाकरे यांचा फोटो लावण्याचे आवाहन
Home » ठळक बातम्या » एक्सीडेंट » भीषण अपघातात पुसेगावचे दाम्पत्य जागीच ठार; मुलगा गंभीर जखमी

भीषण अपघातात पुसेगावचे दाम्पत्य जागीच ठार; मुलगा गंभीर जखमी

भीषण अपघातात पुसेगावचे दाम्पत्य जागीच ठार; मुलगा गंभीर जखमी

वर्धनगड-नेर फाट्यानजीक कार-आयशरची समोरासमोर धडक; पुसेगाववर शोककळा

पुसेगाव : सातारा–पंढरपूर मार्गावर वर्धनगड-नेर फाट्यानजीक रविवारी मध्यरात्री कार आणि आयशर वाहनाची समोरासमोर भीषण धडक झाली. या अपघातात पुसेगाव येथील दाम्पत्याचा जागीच मृत्यू झाला, तर त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला. या दुर्दैवी घटनेमुळे पुसेगाव परिसरावर शोककळा पसरली आहे.

या अपघातात विजय बबन भोसले आणि त्यांच्या पत्नी समृद्धी विजय भोसले यांचा मृत्यू झाला. विजय भोसले हे सेवागिरी शिक्षण मंडळ विद्यालयात लिपिक म्हणून कार्यरत होते. अपघातात त्यांचा मुलगा गंभीर जखमी झाला असून त्याच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत.

दरम्यान, अपघाताची माहिती मिळताच संबंधित यंत्रणांनी घटनास्थळी धाव घेतली. अपघात नेमका कशामुळे झाला, याबाबतचा तपास सुरू आहे. या घटनेने पुसेगावसह परिसरात हळहळ व्यक्त होत असून भोसले कुटुंबीयांवर दुःखाचा डोंगर कोसळला आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नायगावात रंगणार भक्तीचा जागर; ज्ञानेश्वरी पारायण व अखंड हरिनाम सप्ताहाला उद्यापासून प्रारंभ

नायगाव येथे उद्यापासून ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा केळघर/प्रतिनिधी : कोरेगाव तालुक्यातील नायगाव येथे श्री ज्ञानेश्वरी सामुदायिक पारायण सोहळा व अखंड

केळघर बाजारपेठेत झेब्रा क्रॉसिंग, स्पीड ब्रेकर बसवा; अन्यथा आंदोलनाचा इशारा महाराष्ट्र रिपब्लिकन पक्षाची प्रशासनाकडे मागणी; नागरिकांच्या सुरक्षेसाठी तातडीने उपाययोजना करण्याचे आवाहन

Live Cricket