पुसेगाव परिमंडळात शिकार मुक्त अभियान
सातारा -पुसेगाव परिमंडळ मधील नियतक्षेत्र पुसेगाव , विसापूर , डिस्कळ मधील सर्व गावात शिकार मुक्त अभियान राबवले जात आहे वन परिमंडळ पुसेगाव चे वनपाल राजाराम काशीद यांनी आवाहन केले आहे कि, आपल्या परिसरात शिकार होत असलेस तसेच जंगल क्षेत्रात वनसंपदेचे नुकसान करणे,वन क्षेत्रात विना परवाना अतिक्रमण करणे,मानव व वन्यजीव संघर्ष अशा बाबी निदर्शनास आलेस नजिक च्या वनरक्षक, वनपाल यांना तात्काळ कळवण्यात यावे माहिती देणाऱ्याचे नाव गोपनीय ठेवले जाईल तसेच त्यास योग्य बक्षीस दिले जाईल.
एक जबाबदार नागरिक म्हणून वनांचे संरक्षण करणे हे आपल्या सर्वांचे कर्तव्य आहे शासना मार्फत पीक नुकसान, पशुधन हानी, मनुष्य हानी यामध्ये नुकसान भरपाई दिली जात असते जंगलापासून आवश्यक प्राण वायू पर्जन्यमान, मृद संधारण अशा महत्वाच्या गोष्टी मिळत असून पुढील पिढी साठी प्रत्येकाने एक झाड लावणे खूप आवश्यक आहे
पुसेगाव परिमंडळ मध्ये शिकारीस आळा बसने कामी गोपनीय खबऱ्याचे जाळे तयार केले असून शिकारीस आळा घालणे कामी रात्र गस्त सुरु आहे
राजाराम काशीद वनपाल पुसेगाव
तसेच अवैध शिकार घडल्यास प्रकरणातील आरोपी यांना 3 ते 7वर्षे शिक्षा रक्कम रुपये 25हजार ते 1 लाखा पर्यत द्रव्य दंड अथवा दोन्ही शिक्षा होऊ शकतात अवैध वृक्षतोड करताना कोणी निदर्शनास आल्यास तत्काळ संपर्क साधावा असे वनपाल पुसेगाव यांचे कडून सांगण्यात आले.





