Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » धन्वंतरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

धन्वंतरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

धन्वंतरी पतसंस्थेच्या दिनदर्शिकेचे प्रकाशन संपन्न

सातारा प्रतिनिधी -सहकार क्षेत्रातील अग्रगण्य असलेल्या व महाराष्ट शासनाने मा. राज्यपाल यांचे हस्ते राज्यात प्रथम क्रमांकाची आदर्श पतसंस्था म्हणून सहकार भूषण पुरस्कार देवून गौरविलेल्या धन्वंतरी पतसंस्थेने सभासद, ठेवीदार, ग्राहक यांचेकरीता तयार केलेल्या सन २०२५ च्या आकर्षक दिनदर्शिकेचे प्रकाशन पतसंस्थेच्या संचालक मंडळाच्या हस्ते मुख्य कार्यालयात करण्यात आले.

दिनदर्शिका प्रकाशन प्रसंगी बोलताना संस्थेचे संस्थापक चेअरमन डॉ. रविंद्र भोसले म्हणाले की, सभासद व ग्राहकांना उपयुक्त अशी माहीती जाहिरात रुपाने दिनदर्शिकेमध्ये समाविष्ट करण्यात आली आहे. आपल्या महाराष्ट्राची परंपरा व संस्कृती यानुसार सदर दिनदर्शिकेत माहिती सामाविष्ट करुन ती जपण्याचा संस्थेने प्रयत्न केला आहे. तसेच आरोग्याच्या दृष्टीने महत्वाचे असणारे सर्व दिनांचीही माहिती उपलब्ध आहे. दिनदर्शिका संस्थेच्या सात शाखांमधून सर्व सभासदांना, ग्राहकांना वाटपाकरीता उपलब्ध करण्यात आली आहे. सभासदांना व ग्राहकांना नम्र विनंती की, त्यांनी संस्थेच्या सातारा, सदरबझार-सातारा, कोरेगांव, फलटण, कराड, तसेच पुणे येथील पिंपरी-चिंचवड व धनकवडी शाखेतून दिनदर्शिका घेवून जावी असे आवाहन त्यांनी केले.

ते पुढे म्हणाले की, संस्थेने नुकतेच सभासदांना १०% लाभांश दिला असून गत आर्थिक वर्षाकरीता सर्वोच्च ऑडीट वर्ग अ मिळालेला आहे. तसेच संस्थेच्या सर्व शाखा स्वमालकीच्या वास्तूत कार्यरत असून सर्व कामकाज संगणकीकृत आहे या सर्व बाबी पतसंस्था भक्कम व उत्तम आर्थिक स्थितीत असल्याचे दर्शवितात. तसेच चालू वर्षीही सर्वच घटकांमध्ये समाधानकारक वाढ झालेली आहे.

यावेळी व्हा. चेअरमन डॉ. कांत फडतरे म्हणाले की, संस्थेने सामाजीक बांधीलकी बरोबरच गेली ३५ वर्षे सहकार खात्याच्या सर्व नियमांचे काटेकोरपणे पालन करुन गुणात्मक व संख्यात्मक वाढ करुन सहकार क्षेत्रात एक आदर्श निर्माण केला आहे. स्थापनेपासून पारदर्शी कामकाज व वेळोवेळी सहकार क्षेत्रात होणारे बदल लवचिकपणे स्विकारण्याची क्षमता व त्या अनुशंघाने व्यवसायीक दृष्टीकोन, सभासदांचा व ठेवीदारांचा संस्थेवरील विश्वास, उच्चशिक्षित संचालक मंडळ, अनुभवी व कार्यतत्पर सेवक वर्ग यामुळे संस्थेने जनमाणसांत भक्कम विश्वासाचे स्थान मिळविले आहे. याचबरोबर सभासद हा केंद्रबिंदू समजून वेळोवेळी राबविलेल्या कल्पना व योजना यामुळेच संस्थेला शासनाने व इतर संस्थांनी वेळोवेळी विविध पुरस्कारांनी सन्मानित केले आहे हि बाब आपणां सर्वाना अभिमानाची आहे. तसेच ग्राहकांना जलद व तत्पर सेवा देण्यासाठी पतसंस्थेत लवकरच कोअर बँकीग हि अदयावत संगणकप्रणाली कार्यान्वित करत आहोत.सदर कार्यक्रमाचे सुत्रसंचालन व आभार प्रदर्शन मुख्य कार्यकारी अधिकारी श्री. संजय पवार यांनी केले.

या प्रसंगी संचालक डॉ. शिरीष भोईटे, डॉ. अरविंद काळे, डॉ. शकील अत्तार, डॉ. हेमंत शिंदे, डॉ. सुनिल कोडगुले, डॉ. राजेंद्र जाधव, डॉ. अभिजीत भोसले, डॉ. श्रीरंग डोईफोडे, डॉ. जयदिप चव्हाण, डॉ. सौ. सारीका मस्कर, डॉ. सौ. हर्षला बाबर, डॉ. नारायण तांबे, अॅड. सुर्यकांत देशमुख, उपमुख्य कार्यकारी अधिकारी श्रीहरी डिंगणे तसेच सर्व कर्मचारी वर्ग व सभासद उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

वाई लो.टिळक आयकर चर्चासत्र

Post Views: 16 वाई:- लो.टिळक आयकर चर्चासत्र वृत्त. वाई,ता.२५:- लोकहितासाठी काम करणाऱ्या सार्वजनिक ट्रस्ट अथवा संस्थानी आयकर कायद्यातील तरतुदीला अनुसरून

Live Cricket