राज्य सरकारच्या वतीने मेढा शहराच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाईल- सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले
केळघर प्रतिनिधी:मेढा शहरातील नागरिकांनी मोठ्या विश्वासाने भाजपला नगरपंचायत निवडणुकीत निवडून दिले आहे. त्यामुळे नगरपंचायत च्या पदाधिकाऱ्यांनी मेढा शहराच्या सर्वांगीण विकासासाठी काम करावे. राज्य सरकारच्या वतीने शहराच्या विकासासाठी भरीव आर्थिक निधी उपलब्ध करून दिला जाईल अशी ग्वाही राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री श्रीमंत छत्रपती शिवेंद्रसिंहराजे भोसले यांनी दिली.मेढा नगरीचे उपनगराध्यक्ष व भारतीय जनता पार्टीचे गटनेते विकासजी देशपांडे यांनी नुकताच उपनगराध्यक्ष पदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी श्री. देशपांडे यांस उपनगराध्यक्ष पदाच्या खुर्चीत मंत्री भोसले यांनी बसवून कार्यभार सोपवला. यावेळी अमित कदम, जावली पंचायत समितीचे सभापती सौरभ शिंदे, उपसभापती गोरख महाडिक, नगराध्यक्ष रुपालीताई वारागडे, भाजप जिल्हा उपाध्यक्ष विठ्ठल देशपांडे ,बांधकाम सभापती शिवाजीराव देशमुख, आरोग्य सभापती नितीन मगरे, महिला बालकल्याण सभापती आनंदीताई करंजेकर, नगरसेवक शिवाजीराव गोरे, हरिश्चंद्र तीवाटणे, सुशांत कांबळे, धनंजय पवार,
नगरसेविका तेजस्विनी इगावे, अनघा करंजेकर, सुनिता तांबे, पुष्पा मुकणे, युवा नेते संतोष वारागडे मंडल अध्यक्ष मारुती चिकने, भाजप मंडलाध्यक्ष संदीप परामने, संकेत करंजेकर, भाजप शहराध्यक्ष संजय सपकाळ, माजी नगराध्यक्ष पांडुरंग बापू जवळ मुख्याधिकारी अजिंक्य पाटील आदी मान्यवर यावेळी बहुसंख्येने उपस्थित होते.यावेळी उपनगराध्यक्ष विकास देशपांडे यांच्या हस्ते मंत्री भोसले यांचा सत्कार करण्यात आला.




