अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट व निकृष्ट कामांवर नगराध्यक्ष सुनिल शिंदे संतप्त; प्रत्यक्ष पाहणीद्वारे चौकशीचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट व निकृष्ट कामांवर नगराध्यक्ष सुनिल शिंदे संतप्त; प्रत्यक्ष पाहणीद्वारे चौकशीचे आदेश

सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अर्धवट व निकृष्ट कामांवर नगराध्यक्ष सुनिल शिंदे संतप्त; प्रत्यक्ष पाहणीद्वारे चौकशीचे आदेश

महाबळेश्वर, प्रतिनिधी : महाबळेश्वर शहरात सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत (PWD) सुरू असलेल्या विविध विकासकामांमधील त्रुटी, अर्धवट कामे आणि निकृष्ट दर्जाबाबत नगराध्यक्ष सुनिल शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केली आहे. मुख्य बाजारपेठेचे सुशोभीकरण, मरी पेठ रस्त्याचे डांबरीकरण, गटारे, विद्युत व्यवस्था तसेच पाणीपुरवठ्याशी संबंधित कामांबाबत नागरिकांकडून मोठ्या प्रमाणात तक्रारी प्राप्त होत असल्याने नगराध्यक्षांनी प्रत्यक्ष पाहणी करून कामांच्या गुणवत्तेची तपासणी करण्याचा निर्णय घेतला आहे.

महाबळेश्वरसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटनस्थळी होणारी विकासकामे दर्जेदार, सुरक्षित आणि दीर्घकाळ टिकणारी असणे अपेक्षित असताना अनेक ठिकाणी कामांचा दर्जा समाधानकारक नसल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे शासकीय निधीचा अपव्यय होत असल्याची भावना नागरिकांमध्ये निर्माण झाली आहे.

मुख्य बाजारपेठेतील कामांवर नागरिकांचा आक्षेप

मुख्य बाजारपेठेच्या सुशोभीकरणासाठी मोठ्या प्रमाणावर निधी खर्च करण्यात आला असला तरी अनेक कामे अद्याप अपूर्ण अवस्थेत आहेत. बसविण्यात आलेले काही दगड हलल्याने डिझाइन विस्कळीत झाले असून बाजारपेठेच्या सौंदर्यावर परिणाम झाल्याची तक्रार व्यापारी आणि नागरिकांनी केली आहे.

तसेच काँक्रीट चेंबरची झाकणे अवघ्या काही दिवसांत खराब झाल्याने कामाच्या गुणवत्तेबाबत प्रश्नचिन्ह निर्माण झाले आहे. काही ठिकाणी विद्युत व्यवस्था अद्याप पूर्ण झालेली नसल्याने पादचारी आणि पर्यटकांना त्रास सहन करावा लागत आहे.

मरी पेठ रस्त्याच्या डांबरीकरणावर प्रश्नचिन्ह

मरी पेठ परिसरातील रस्त्याचे डांबरीकरण घाईगडबडीत आणि तांत्रिक निकषांकडे दुर्लक्ष करून करण्यात आल्याचा आरोप नागरिकांनी केला आहे. नव्याने तयार झालेला रस्ता अल्पावधीतच खराब होण्याची शक्यता व्यक्त करण्यात येत असून यामुळे पुन्हा निधी खर्च करण्याची वेळ येऊ शकते, अशी भीतीही नागरिकांनी व्यक्त केली आहे.

गटारे, केबल्स आणि पाईपलाईनमध्ये गंभीर त्रुटी

पावसाळ्याच्या तोंडावर बांधण्यात आलेल्या गटारांना योग्य उतार न दिल्याने पाणी साचण्याची आणि तुंबण्याची शक्यता निर्माण झाली आहे. याशिवाय अनेक ठिकाणी मिळकतींमध्ये जाणाऱ्या पाईपलाईन आणि विद्युत केबल्स गटारामध्ये उघड्यावर सोडण्यात आल्याचे निदर्शनास आले आहे.

नागरिकांच्या मते, या सुविधा स्वतंत्र ब्रिज किंवा सुरक्षित मार्गाद्वारे संबंधित मिळकतींपर्यंत नेणे आवश्यक होते. तसे न झाल्यास भविष्यात अपघात, देखभाल आणि दुरुस्तीच्या समस्या निर्माण होऊ शकतात.

१०० कोटींच्या सुशोभीकरण प्रकल्पाबाबत अपेक्षा

सुशोभीकरण प्रकल्पांतर्गत बसविण्यात आलेल्या डीपी आणि विद्युत केबल्स अधिक सुरक्षित व नियोजनबद्ध पद्धतीने बसविण्यात याव्यात, त्या पादचाऱ्यांसाठी अडथळा ठरू नयेत, अशी नागरिकांची अपेक्षा आहे. तसेच पाणीपुरवठ्यासाठी टाकण्यात आलेल्या काही पाईपलाईन्स अद्याप कार्यान्वित झालेल्या नसल्याने त्याचा अपेक्षित लाभ नागरिकांना मिळालेला नाही.

“निकृष्ट कामे खपवून घेतली जाणार नाहीत” – नगराध्यक्ष

यासंदर्भात नगराध्यक्ष सुनिल शिंदे म्हणाले, “महाबळेश्वर हे राज्यातील महत्त्वाचे पर्यटनस्थळ आहे. येथे येणाऱ्या पर्यटकांना आणि स्थानिक नागरिकांना दर्जेदार सुविधा मिळणे आवश्यक आहे. विकासकामांमध्ये कोणतीही तडजोड सहन केली जाणार नाही. अर्धवट, निकृष्ट किंवा निष्काळजीपणे झालेल्या कामांची जबाबदारी निश्चित केली जाईल.”

संयुक्त पाहणी व कारवाईचे संकेत

नगराध्यक्षांनी संबंधित कामांची प्रत्यक्ष पाहणी करून पालिका प्रशासन, सार्वजनिक बांधकाम विभाग आणि तांत्रिक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत गुणवत्तेची तपासणी करण्याचे निर्देश दिले आहेत. तपासणीत त्रुटी आढळल्यास संबंधित ठेकेदारांकडून कामे दुरुस्त करून घेण्याबरोबरच वरिष्ठ स्तरावर तक्रार करण्यात येणार असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.

महाबळेश्वरच्या सौंदर्याला आणि पर्यटन प्रतिमेला बाधा आणणाऱ्या या कामांबाबत नागरिकांमध्ये तीव्र नाराजी व्यक्त होत असून, नगराध्यक्षांच्या भूमिकेनंतर आता प्रत्यक्षात कोणती कारवाई होते याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket