सार्वजनिक बांधकाम विभागाची बेकायदा होर्डिंग वर कडक कारवाई
48 तासाची दिली मुदत
वाई प्रतिनिधी: पसरणी घाट ते पाचगणी पर्यंतचे घाटातील बेकायदा उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंग्स विरोधात सार्वजनिक बांधकाम विभाग वाई आक्रमक झाले आहे गुरुवार दिनांक 30 रोजी बांधकाम विभागाचे अभियंते महेश गोजरी यांच्या मार्गदर्शनाखाली रस्त्याच्या कडेला घाटातील अनेक वळणावर उभारलेल्या फ्लेक्स व होर्डिंगवर कारवाईला सुरुवात करण्यात आली आहे यामुळे बेकायदा होर्डिंग उभारणी करणाऱ्यांचे धाबे दनानले आहेत याचबरोबर घाटातील 20 बेकायदा होर्डिंग धारकांना 48 तासाची मुदत दिली आहे
मुंबईतील घाटकोपर मधील दुर्घटनेनंतर सार्वजनिक बांधकाम विभाग वाई अलर्ट झाले आहे घाटात बांधकाम विभागाची परवानगी न घेता लावलेले व धोकादायक झालेले 19 होर्डिंग वर कारवाई करण्यात आले आहे बांधकाम विभागाची ही कारवाई दोन दिवस राबवण्यात येणार आहे हॉटेल व्यवसायिकांनी जाहिरातीचे फ्लेक्स स्वतःहून काढून घेण्यात यावेत असे आवाहन बांधकाम विभागाच्या वतीने करण्यात आले आहे.