Post Views: 58
अतुल गजानन मर्ढेकर यांची संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे नायब तहसीलदार म्हणून वाई तहसील कार्यालयात पदोन्नती
वाई शहर,ता.१८: येथील तहसील कार्यालयातील पुरवठा निरीक्षक अतुल गजानन मर्ढेकर यांची संजय गांधी निराधार व स्वावलंबन योजनेचे नायब तहसीलदार म्हणून वाई तहसील कार्यालयात पदोन्नतीने नियुक्ती झाली.
पसरणी (ता. वाई) येथील रहिवासी असलेल्या मर्ढेकर यांनी यापूर्वी प्रांत कार्यालय, पुरवठा अव्वल कारकुन, महसूल अव्वल कारकुन म्हणून वाई,महाबळेश्वर व खंडाळा येथे काम केले आहे.उपविभागीय अधिकारी राजेंद्रकुमार जाधव,तहसीलदार सोनाली मेटकरी, गायब तहसीलदार वैशाली घोरपडे,भाऊसाहेब जगदाळे यांनी त्यांचे अभिनंदन केले.
