Home » देश » पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी – नामदेवराव पाटील

पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी – नामदेवराव पाटील

पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्यानेच विमानतळ विस्तारसाठी वेळोवेळी निधी – नामदेवराव पाटील

 कराड : स्व. यशवंतराव चव्हाण साहेब यांचे स्वप्न आणि धोरण होते की प्रत्येक तालुकास्तरावर विमानतळ असले पाहिजे. त्यानुसार कराड येथे विमानतळाची स्थापना झाली. त्यानंतर कालांतराने यशवंतराव चव्हाण साहेबांच्या नंतर कराड चे सुपुत्र श्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे महाराष्ट्राचे मुख्यमंत्री झाले व त्यांनी यशवंतराव चव्हाण साहेबांच्या जन्मशताब्दी निमित्त कराड साठी विशेष निधीची तरतूद केली. त्याचवेळी कराड विमानतळाचे विस्तारीकरण भविष्याच्या दृष्टीने महत्त्वाचे आहे असे जाणून यासाठी पृथ्वीराज बाबांनी तरतूद करीत नियोजन केले. कराड विमानतळाचे विस्तारीकरण हे माजी मुख्यमंत्री मा.पृथ्वीराज बाबा चव्हाण यांचे काम असून त्यांच्या ड्रीम प्रोजेक्ट मधील हा एक महत्वाचा उपक्रम आहे. त्यांनी त्यांच्या दूरदृष्टीने मुख्यमंत्री पदाच्या काळापासून कराडच्या विमानतळाचे विस्तारीकरण साठी सर्व प्रशासकीय परवानगी पासून ते निधी मिळेपर्यंत पूर्ण पाठपुरावा केलेला आहे. कराडच्या विमानतळ विस्तारीकरणासाठी १७.१६ कोटींच्या निधीबाबत जो श्रेय घेण्याचा प्रयत्न झाला त्याबाबतची सत्यता व माहिती देणे महत्वाचे असल्याने हे प्रसिद्धीपत्रकाद्वारे मांडत आहे. 

वास्तविक माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज बाबा चव्हाण हे कराड विमानतळाच्या विस्तारीकरण साठी मुख्यमंत्री काळापासून आग्रही आहेत. विस्तारिकरण बाबतच्या सर्व परवानगी आणि प्रशासकीय मान्यता पृथ्वीराज बाबांच्या पाठपुराव्याने पूर्तता झाल्यानंतर निधी प्राप्त व्हायला सुरुवात झाली. 2023-24 साली २२१.५१ कोटी इतका निधी मंजूर झाला. ४ ऑगस्ट २०२५ रोजी प्रसिद्ध झालेल्या शासन आदेशात स्पष्ट नमूद केले आहे कि, कराड विमानतळाच्या विस्तारीकरण कामासाठी २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयान्वये रु. ९५.६४ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता प्रदान करण्यात आली. तसेच उक्त शासन निर्णयातील कामांसाठी २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयान्वये रु. २२१.५१ कोटी इतक्या खर्चास प्रशासकीय मान्यता देण्यात आली होती. 

तसेच या शासन निर्णयामध्ये असे आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ रोजीच्या शासन निर्णयानुसार भैरवनाथ पाणी पुरवठा योजनेच्या पाइपलाइनचे वळतीकरण करणेकरीता रु. ८.५० कोटी इतक्या खर्चासाठीची रक्कम हि. २८ ऑगस्ट २०१२ च्या शासन निर्णयामध्ये नमूद केल्याप्रमाणे ठेवण्यात आली आहे. शासन आदेश स्पष्ट वाचला की समजून येईल. शासन आदेशात स्पष्ट आहे कि, २९ नोव्हेंबर २०२३ च्या शासन निर्णयातील अ.क्र. ९ मधील भैरवनाथ सहकारी पाणीपुरवठा योजेनच्या पाईपलाईनचे स्थलांतर करण्याकरिता रु. १७.१६ कोटी इतक्या खर्चास द्वितीय सुधारित मान्यता देण्यात येत आहे. असा स्पष्ट उल्लेख करण्यात आलेला आहे. 

तसेच विमानतळ बाधितांना मोबदला मिळण्यासाठी व पुनर्वसनाकरिता भूसंपादनाची कार्यवाही व भैरवनाथ पाणीपुरवठा योजेनच्या पाइपलाइनचे स्थलांतर करणे या विषयावर माननीय पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या अध्यक्षतेखाली २० जुलै २०२४ रोजी मिटिंग सुद्धा झाली होती. 

यामुळे माजी मुख्यमंत्री पृथ्वीराजबाबा चव्हाण यांनी कराडच्या विकासासाठी दूरदृष्टीचा विचार करून कराडच्या विमानतळ विस्तारीकरणसाठी वेळोवेळी पाठपुरावा केलेला आहे तसेच निधी सुद्धा मंजूर करून आणला आहे. पृथ्वीराज बाबांनी कराडचा सर्वांगीण विकासासाठी निश्चितपणे दुरदृष्टीने विकास केला आहे. पृथ्वीराज बाबांनी केलेल्या कामांचे उदघाटन तसेच त्यांनी आणलेला विकासनिधी बाबत कोणताही श्रेयवाद न करता कराड दक्षिणची आजपर्यंतची गरिमा राखली पाहिजे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी

Post Views: 35 सातारा जिल्हा बॉक्सिंग स्पर्धेत श्रीपतराव पाटील हायस्कूलला सुवर्ण झळाळी सातारा:करंजे पेठ येथील शिक्षण प्रसारक संस्था संचलित श्रीपतराव

Live Cricket