Home » राज्य » शिक्षण » प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा वाढदिवस उत्साहात साजरा

 सातारा, दि. २० : येथील पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूटचे संस्थापक प्राचार्य सुनील कुमार पाटील यांचा 61 वा वाढदिवस नुकताच उत्साहात साजरा करण्यात आला.

 आपल्या स्वतःच्या जिद्द, चिकाटी व अविरत संघर्षाच्या जोरावर प्रतिकूल परिस्थितीवर मात करून प्राचार्य सुनील कुमार पाटील यांनी पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट या संस्थेची स्थापना केली. गेल्या 35 वर्षांच्या प्रदीर्घ वाटचालीत त्यांनी अनेक आव्हाने स्वीकारली अनेक संकटांना सामोरे जात त्यांनी संस्थेची भरभराटी केली. अनेकांनी पाटील इलेक्ट्रॉनिक्स इन्स्टिट्यूटला आव्हान देण्याचा प्रयत्न केला मात्र त्यात त्यांना यश आले नाही प्राचार्य पाटील यांनी घेतलेल्या मेहनतीमुळे ही संस्था नावारूपास आली आहे असे मत गणेश देशपांडे यांनी व्यक्त केले.

 प्राचार्य पाटील यांनी 35 वर्षांपूर्वी पाटील इलेक्ट्रॉनिक इन्स्टिट्यूट ची स्थापना केली. सामाजिक बांधिलकीची खरी तळमळ त्यांच्यात दिसून येत होती म्हणूनच ही संस्था काही दिवसातच नावारूपास आली आहे. ग्रामीण भागातील सर्वसामान्य कुटुंबातील गोरगरीब मुलांना त्यांनी शिक्षणाची कवाडी खुली करून दिली. इतक्या वर्षांच्या दीर्घ वाटचालीत त्यांना त्यांच्या सुविध्य पत्नी सौ.संगीता पाटील 

 चिरंजीव प्राचार्य सुजित पाटील तसेच बंधू अशोक पाटील, नंदकुमार पाटील यांची मोलाची साथ मिळाली, असे मत महेश देशपांडे यांनी व्यक्त केले.यावेळी हेमंत गौंड यांनी मनोगत व्यक्त होते। 

यावेळी तानाजी यादव शिवाजी यादव ज्ञानेश्वर सावंत अरुणराव जाधव श्रीकृष्ण जाधव राजेंद्र साबळे मदन जाधव गणेश नलवडे ज्योत्स्ना बोडके यांसह प्रसार माध्यमांचे प्रतिनिधी व पाटील कुटुंबीय, नातेवाईक उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले

Post Views: 11 बबनराव लोणीकरांना माफी नाही तर ठोका, ‘त्या’ वादग्रस्त वक्तव्यावरून बच्चू कडू भडकले प्रतिनिधी -भाजपचे नेते बबनराव लोणीकरांवर

Live Cricket