पुणे केंब्रिज सिनियर काॕलेजच्या प्राचार्यपदी डाॕ पी. कुलकर्णी
सातारा – पुरंदर टेक्निकल एज्युकेशन सोसायटी आंबेगांव पुणे येथील पुणे केंब्रिज सिनियर काॕलेजच्या प्राचार्यपदी सातारा येथील डाॕ पी. कुलकर्णी यांची नुकतीच निवड झाली. पुरंदर संस्थेचे संस्थापक अध्यक्ष प्रा. डाॕ सी. जी. कुंजीर, उपाध्यक्ष प्रा. सौ. छाया कुंजीर, फायनान्स मॕनेजमेंट डायरेक्टर श्री. मयूर कुंजीर, अॕकॕडमीक मॕनेजमेंट डायरेक्टर सौ. प्रितम कुंजीर, अॕडमिन मॕनेजमेंट डायरेक्टर श्री. गौरव कुंजीर, कँपस अॕडमिन डायरेक्टर प्रा. स्मिता कुलकर्णी, कँपस अॕकॕडमीक डायरेक्टर डाॕ मनोहर कराडे, पुरंदर संस्थेच्या सर्व विभागातील प्रमुख, शिक्षक, प्राध्यापक, शिक्षकेतर कर्मचारी यांनी डाॕ पी. कुलकर्णी यांचे प्राचार्यपदी निवड झाल्याबद्दल अभिनंदन केले व शुभेच्छा देऊन स्वागत केले.
“डाॕ पी. कुलकर्णी यांचा शिक्षण क्षेत्रातील ३० वर्षाहून अधिक काळचा अनुभव, शिक्षण क्षेत्रातील घडामोडींना नाविन्यपूर्ण दृष्टिकोन ठेवून सामोरं जाण्याची पध्दत, संशोधक वृत्ती, सातात्याने इतरांना प्रेरणा देण्याची भुमिका आणि नवनवीन गोष्टी करण्यासाठी आव्हानांना सामोरं जाऊन विस्तार करण्याची धडपड यामुळे पुरंदर संस्थेचा विस्तार झपाट्याने होईल” असा विश्वास संस्थेचे अध्यक्ष डाॕ सी. टी. कुंजीर यांनी डाॕ पी. कुलकर्णी यांनी पदभार घेतेवेळी व्यक्त केला.
यापुर्वी डाॕ पी. कुलकर्णी यांनी सातारा आणि कोकणात वरिष्ठ महाविद्यालयात प्राध्यापक आणि प्राचार्य म्हणून काम केले आहे. तसेच डाॕ पी. कुलकर्णी हे २०१९ ते २०२३ या काळात यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक येथे वाणिज्य व व्यवस्थापन विभागाचे सल्लागार म्हणून कार्यरत होते. पी-एज्युकुल डिजीव्हर्सिटी प्रा. लि. या डिजीटल प्लॕटफाॕर्मच्या माध्यमातूध डिजीटल कंटेट, फक्त शिक्षणासाठी कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर यावर कोरोनापश्चात डाॕ. पी. कुलकर्णी काम करत आहेत. विशेषतः व्यावसायिक परीक्षांचे तज्ञ मार्गदर्शक म्हणून त्यांचा मोठा नांवलोकिक आहे. तसेच त्यांनी काही संस्थांचे मार्गदर्शक आणि संस्था उभारणीत महत्वपूर्ण योगदान दिलेले आहे. राज्य आणि राष्ट्रीय स्तरावरील काही संस्थांचे पदाधिकारी, सल्लागार आणि मार्गदर्शक म्हणूनही ते कार्यरत आहेत.
प्राचार्य डाॕ पी. कुलकर्णी ज्या पुरंदर टेक्निकल एज्युकेशन सोसायटीमध्ये कार्यरत आहेत, तिथे सेमी, इंग्रजी आणि सीबीएसी माध्यमाच्या तीन शाळा, आर्टस्, काॕमर्स, सायन्सची तीन ज्युनिअर काॕलेजेस, आर्टस्, काॕमर्स, सायन्स, काॕम्प्युटर सायन्स, बीबीए, बीसीए सिनियर काॕलेज, एमबीए, एमसीए इन्स्टीट्यूट, लाॕ काॕलेज इ. केजी टू पीजीसाठी शैक्षणिक उपक्रमांच्या सुविधा आणि सोई आहेत.
सातारा आणि पश्चिम महाराष्ट्रातील विद्यार्थी आणि पालकांसाठी आणि डाॕ पी. कुलकर्णी यांचे संपूर्ण महाराष्ट्रभर असलेला शिक्षण क्षेत्रातील प्रचंड संपर्क विचारात घेता पुणे येथे जाऊन शिक्षण घेण्यासाठी एक हक्काचा मार्गदर्शक पुणे येथे उपलब्ध झाल्यामुळे विद्यार्थी आणि पालकांत समाधान व्यक्त करण्यात येत आहे.




