अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » प्रशासकीय » सावंत कुटुंबाचा अभिमान! स्वराज सावंत यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड

सावंत कुटुंबाचा अभिमान! स्वराज सावंत यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड

सावंत कुटुंबाचा अभिमान! स्वराज सावंत यांची भारतीय सैन्यदलात लेफ्टनंटपदी निवड

सातारा -सातारा जिल्ह्यातील डिस्कळ गावासाठी अभिमानाची बातमी समोर आली आहे. माजी तालुका मास्तर आयु. मारुती बाजी सावंत (डिस्कळ) व माजी मुख्याध्यापिका आयु. सौ. कुसुम मारुती सावंत यांचे नातू, तसेच प्राथमिक शिक्षक सहकारी बँक सातारा येथील उप मुख्य कार्यकारी अधिकारी आयु. सुदर्शन मारुती सावंत यांचे सुपुत्र आयु. स्वराज सुदर्शन सावंत यांची भारतीय सैन्यदल मध्ये क्लास वन अधिकारी म्हणून लेफ्टनंट पदावर निवड झाली आहे.

स्वराज सावंत यांनी कठोर परिश्रम, जिद्द आणि शिस्तबद्ध तयारीच्या जोरावर हे यश संपादन केले आहे. लहानपणापासूनच देशसेवेची प्रेरणा मिळाल्याने त्यांनी सैन्यदलात जाण्याचे ध्येय ठरवले होते. कुटुंबातील शैक्षणिक व सामाजिक परंपरेचा वारसा पुढे नेत त्यांनी आज सावंत कुटुंबाचे तसेच सातारा जिल्ह्याचे नाव उज्ज्वल केले आहे.

त्यांच्या या उल्लेखनीय यशाबद्दल परिसरातून त्यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत असून विविध स्तरांतून शुभेच्छा दिल्या जात आहेत. स्वराज सावंत यांचे यश हे युवकांसाठी प्रेरणादायी ठरणारे आहे.

देशसेवेच्या पवित्र कार्यासाठी सज्ज झालेल्या स्वराज सावंत यांना पुढील वाटचालीसाठी मनःपूर्वक शुभेच्छा!

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket