महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर! पाचगणी पोलीस ठाणे हद्दीतील रेकॉर्डवरील गुन्हेगार भरत तुकाराम मालुसरे हा सातारा जिल्हयातुन २ वर्षाकरीता तडीपार 
Home » ठळक बातम्या » आरोग्य » माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व जयवंतराव आवटे यांचे मार्गदर्शन: प्रमोद शिंदे यांची माहिती

माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व जयवंतराव आवटे यांचे मार्गदर्शन: प्रमोद शिंदे यांची माहिती 

माजी खासदार स्व. लक्ष्मणराव पाटील यांच्या जयंतीदिनी ‘किसन वीर’ वर महाआरोग्य शिबीर व जयवंतराव आवटे यांचे मार्गदर्शन: प्रमोद शिंदे यांची माहिती 

सातारा -सातारा जिल्ह्यात पोलादी पुरूष म्हणन ओळखले जाणारे किसन वीर कारखान्याचे माजी चेअरमन, सातारा जिल्हा बँकेचे माजी चेअरमन तथा सातारा लोकसभा मतदार संघाचे माजी खासदार स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या ८८ व्या जयंतीनिमित्त बधवार दि. २५ फेब्रुवारी रोजी किसन वीर सातारा सहकारी साखर कारखाना कार्यस्थळावर वाळवा जि. सांगली येथील कथाकथनकार-वक्ते जयवंतराव आवटे यांचे मार्गदर्शन सकाळी १० वाजता व महाआरोग्य शिबीर सकाळी ९ ते दपारी ४ वाजेपर्यत आयोजित करण्यात आले असल्याची महिती प्रसिद्धीपत्रकाद्वारे कारखान्याचे उपाध्यक्ष प्रमोद शिंदे यांनी दिली.

प्रसिद्धीपत्रकात पुढे म्हटले आहे की, लक्ष्मणरावतात्या पाटील यांचा स्पष्टवक्तेपणा, निर्भिडपणे बोलणे ही त्यांची ख्याती होती. त्यामुळेच तात्यांची जिल्ह्यामध्ये पोलादी पुरूष म्हणून ओळख होती. सर्वसामान्य कार्यकर्त्यालादेखील तात्यांनी ताकद देऊन त्यांच्या मनामध्ये राज्य करणारा असा नेता होता. तात्यांनी त्यांच्या सार्वजनिक जीवनात सामाजिक, राजकीय, सांस्कतिक, क्षेत्रामध्ये आपल्या कामाचा ठसा उमठविलेला दिसून येतो. तात्यांच्या जाण्याने आम्हा कार्यकर्त्यामध्ये जी पोकळी निर्माण झालेली होती. ती पोकळी भरून काढण्याचे काम राज्याचे मदत व पुनर्वसन मंत्री तथा किसन वीर कारखान्याचे चेअरमन नामदार मकरंदआबा पाटील करीत आहेत.

कारखाना कार्यस्थळावर किसन वीर कारखाना, राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी, मिरज येथील सेवासदन लाईफ लाईन सपर स्पेशालिटी हॉस्पिटल, शेद्रे-सातारा येथील ऑन्को लाईफ लाईन सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल, भुईंज येथील प्राथमिक आरोग्य केंद्र यांच्या संयुक्त विद्यमाने मोफत महाआरोग्य शिबीर, रक्तदान, मोफत मोतीबिंदू निदान शिबीर, नेत्र तपासणी व अल्पदरात चष्मे वाटप सकाळी ९ ते दपारी ४ वाजेपर्यत होणार आहेत. यामध्ये संपुर्ण शरीराची तपासणी, अत्याधुनिक मशीनद्वारे मोफत ई.सी.जी.. हृदयविकार, मेंदु विकार, बायपास शस्त्रक्रिया, बी. पी., हिमोग्लोबीन, मधुमेह, एच. आय. व्ही., संसर्गजन्य आजार, टी. बी., सिपिलीस, कावीळ.

ऑन्जिओग्राफी ऑन्जिओप्लास्टी, तोंडाचा कॅन्सर, घशाचा कॅन्सर, फुफुसाचा कॅन्सर, गर्भाशयाचा कॅन्सर, गर्भाशय मुखाची तपासणी, आतड्याचा कॅन्सर, किडणी व मुत्राशायाचा कॅन्सर, फिट, पॅरेलिसिस, डोकेदखी, चक्कर, स्नायुंचे आजार, किडनी विकार, हर्निया, मुळव्याध, पित्तशयातील खडे, अपेंडिक्स, पोटांच्या व इतर शस्त्रक्रियेबाबत मार्गदर्शन करणार असून तज्ञ डॉक्टरांच्या मार्गदर्शनाखाली सर्व आजारांची मोफत तपासणी करून सर्व प्रकारचे औषधोपचार करण्यात येतील. रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यास आयोजकांच्यामार्फत आकर्षक भेटवस्तु देण्यात येणार आहे, तसेच सकाळी १० वाजता कारखाना कार्यस्थळावर जयवंतराव आवटे यांच्या उपस्थितीत अभिवादन कार्यक्रम आयोजित करण्यात आलेला असून कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी नामदार मकरंदआबा पाटील व खासदार नितीनकाका पाटील यांची प्रमख उपस्थिती राहणार आहे.

स्व. लक्ष्मणरावतात्या पाटील यांच्या जयंतीनिमित्त होणाऱ्या अभिवादन कार्यक्रम व महाआरोग्य शिबीरास सर्व सभासद बंधू-भगिनी, हितचिंतक, कंत्राटदार, वाहन मालक आणि कार्यकर्त्यानी उपस्थित कार्यक्षेत्रातील रहावे, असे आवाहनही कारखान्याचे व्हाईस चेअरमन प्रमोद शिंदे, कार्यकारी संचालक जितेंद्र रणवरे, कारखान्याच्या संचालक मंडळाने केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त

महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त खवले मांजराचे खवले तस्करी प्रकरणी वनविभागाची धडक

Live Cricket