एन.डी.आर.एफ. जवानांकडून तांबवेतील संभाव्य पुरपरस्थितीची पहाणी
तांबवे –कोयना धरण पाणलोट क्षेत्रात जोरदार पाऊस सुरू आहे यामुळे धरणातून पाण्याचा विसर्ग सुरू आहे.पाणी नदीपात्राबाहेर जाऊ लागलेणे नदीकाठी धोक्याच्या पार्श्वभूमीवर उपाययोजना म्हणून एफडीआय एफ च्या जवानांनी गावास भेट देऊन महापुराचु पाहणी केली.
तालुक्यात सकाळपासून मुसळधार कोसळणाऱ्या पावसपुन्हा पावसाचा जोर वाढला आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा-कोयनेसह अन्य उपनद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे. दरम्यान, पूरस्थिती निर्माण होणाऱ्या तांबवे गावास एनडीआरएफच्या पथकाने भेट देऊन तेथील पाहणी करून तलाठी, ग्रामसेवक यांच्याकडून माहिती घेतली. नदीकाठी धोक्याच्या पार्श्वभूमीवर प्रशासनाकडून आवश्यक त्या उपाययोजना हाती घेण्यात आल्या आहेत.
शहरासह तालुक्यात आज दुपारपासून पावसाने उघडीप दिली होती. त्यामुळे नागरिकांना दिलासा मिळाला होता. मात्र सायंकाळनंतर पुन्हा पावसाचा जोर पुन्हा वाढला आहे. कोयना धरणातून पाणी सोडण्यात आल्याने कृष्णा-कोयनेसह, तारळी, वांग, दक्षिण मांड, उत्तर मांड
या उपनद्यांच्या पाणी पातळीतही मोठी वाढ झाली आहे. त्यामुळे पाणी नदीच्या पात्राबाहेर आले आहे. पावसाने शेतात अनेक ठिकाणी पाणी साचून राहिले आहे. घरांच्या पडझडीचे सत्रही सुरूच आहे. त्यामुळे काही ठिकाणी लोकांच्या निवाऱ्याचा प्रश्न निर्माण झाल्याने संबंधितांना मंदिरात, शाळेत स्थलांतरित करण्यात आले आहे. दरम्यान, पूरस्थिती
निर्माण होणाऱ्या कऱ्हाड शहर, तांबवे, आटके, म्होप्रे, येरवळे, चचेगावसह अन्य गावात आज एनडीआरएफच्या पथकाचे प्रमुख सुजित पासवान, भरत पाटील व अन्य पथकाने भेट देऊन त्या परिसराची पाहणी केली. या वेळी त्यांनी संबंधित गावातील तलाठी, ग्रामसेवक, ग्रामपंचायतीचे कर्मचाऱ्यांकडून माहिती घेतली. त्यानंतर त्यांनी पूरस्थिती निर्माण झाल्यावर काय उपाययोजना करता येतील, यासंदर्भात प्रामस्थांना मार्गदर्शन केले. चौकट,- एन.डी.आर.एफ. जवानांकडून तांबवेतील संभाव्य पुरपरस्थितीची पहाणी—
N.D.R.F.चे इन्स्पेक्टर सुजित पासवान, असि.सब.इन्स्पेक्टर भरत पाटील यांचे नेतृत्वाखालील एन.डी.आर. एफच्या टिमने आज तांबवेस भेट देऊन संभाव्य पुरपरस्थितीची माहीती घेतली तसेच आपत्कालीन परिस्थितीत सामोरे कसे जायचे याबाबत ग्रामस्थांना मार्गदर्शन केले.