Post Views: 62
वाई खंडाळा महाबळेश्वर विधानसभा मतदारसंघात बावधन विरुद्ध बोपेगाव लढतीची शक्यता?
सातारा -(अली मुजावर )विधानसभेसाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने वाई विधानसभा मतदारसंघातून उमेदवारांची चाचपणी सुरू केली आहे. लोकसभेच्या निवडणुकीत शशिकांत शिंदेंना वाई विधानसभा मतदारसंघातून मताधिक्य मिळाले होते. पार्श्वभूमीवर विधानसभेसाठी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे (अजित पवार गट) आमदार मकरंद पाटील यांच्या विरोधात राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाने उमेदवार देण्याची तयारी केली आहे.बावधन येथील नेते शशिकांत पिसाळ आणि अरुणादेवी पिसाळ यांनी शरदचंद्र पवार यांची भेट घेतली असून पिसाळ कुटुंबातील उमेदवारास शरद पवार राष्ट्रवादी गटातून उमेदवारी मिळण्याची शक्यता आहे.
