सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » ठळक बातम्या » आरोग्य » डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा-डॉ मनोहर ससाणे

डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा-डॉ मनोहर ससाणे

डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत जिल्हा परिषद अध्यक्ष प्रियाताई शिंदे व जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांशी सकारात्मक चर्चा-डॉ मनोहर ससाणे

सातारा -डॉक्टरांचे काही प्रश्न आहेत. त्यांच्या काही अडचणी आहेत यासंदर्भात जिल्हा परिषद अध्यक्ष सौ प्रियाताई शिंदे, उपाध्यक्ष राजेंद्रजी भोसले तसेच आरोग्य अधिकारी डॉ. महेश खलीपे यांच्याशी सकारात्मक चर्चा झाली असून, डॉक्टरांच्या प्रश्नांबाबत योग्य तो मार्ग काढू असे आश्वासन त्यांनी दिले असल्याचे हॉस्पिटल ओनर्स असो. अध्यक्ष डॉ मनोहर ससाणे यांनी दिली.

यावेळी बोलताना त्यांनी सांगितले की हॉस्पिटल ओनर्स असो. चे पदाधिकारी तसेच रुरल निमा, जनरल प्रॅक्टिशनर्स असो. आणि होमिओपॅथी प्रॅक्टिशनर्स यांच्या पदाधिकऱ्यांनी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांची भेट घेऊन त्यांच्याशी डॉक्टरांना येणाऱ्या अडचणींबाबत सविस्तर चर्चा करून लेखी निवेदन सादर केले.

यामध्ये डे-केअर सुविधा असलेल्या लहान दवाखान्यांना नोंदणी बंधनकारक करू नये. ज्याठिकाणी रुग्णांना ऍडमिट केले जात नाही, मात्र पाच बेड्स पर्यंत डे-केअर सुविधा उपलब्ध आहेत, अशा दवाखान्यांना नोंदणीची सक्ती करू नये. तसेच बोगस डॉक्टरांच्या विरोधातील कारवाई करताना नोंदणीकृत डॉक्टरांना त्याचा त्रास होऊ नये अशी मागणी करण्यात आली आणि त्याबाबत लेखी निवेदन सादर करण्यात आले.

यासर्व प्रश्नांवर सकारात्मक विचार करण्याचे आश्वासन जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष आणि जिल्हा आरोग्य अधिकाऱ्यांनी दिले आहे. यावेळी जिल्हा परिषद अध्यक्ष, उपाध्यक्ष, आणि सभापती यांचा संघटनांच्या वतीने सत्कार करण्यात आला आणि पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा देण्यात आल्या. या प्रसंगी चारही वैद्यकीय संघटनांचे पदाधिकारी आणि सदस्य डॉक्टर्स मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket