Home » ठळक बातम्या » सातारा बसस्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार ना.शिवेंद्रसिंहराजे आणि ना. प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक चर्चा

सातारा बसस्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार ना.शिवेंद्रसिंहराजे आणि ना. प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक चर्चा 

सातारा बसस्थानकाचे रुपडे लवकरच पालटणार ना.शिवेंद्रसिंहराजे आणि ना. प्रतापराव सरनाईक यांच्यात सकारात्मक चर्चा 

सातारा- वाहतूक कोंडी टाळण्यासाठी तसेच प्रवाशांना सर्व प्रकारच्या सुविधा उपलब्ध करून देणे व जुन्या बस स्थानकाचे आधुनूकीकरण करणे असा निर्णय घेण्यात आला असून येथील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर आधुनिक, सुसज्ज व प्रवासी-केंद्रित बसस्थानक उभारण्याबाबत सकरात्मक चर्चा झाली आहे.

मध्यवर्ती बसस्थानकाच्या पुनर्बांधणी व विस्ताराच्या कामास गती देण्यासाठी राज्याचे सार्वजनिक बांधकाम मंत्री शिवेंद्रसिंहराजे भोसले यांच्या मागणीनुसार मंत्रालयात आज संयुक्त आढावा बैठक पार पडली. या बैठकीला परिवहन मंत्री प्रतापराव सरनाईक यांची प्रमुख उपस्थिती होती. बैठकीला परिवहन विभाग, महाराष्ट्र राज्य मार्ग परिवहन महामंडळ व सार्वजनिक बांधकाम विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते.

सातारा येथील जुन्या बसस्थानकाच्या जागेवर आधुनिक, सुसज्ज व प्रवासी-केंद्रित बसस्थानक उभारण्याबाबत सविस्तर चर्चा करण्यात आली. वाढती प्रवासी संख्या, शहरातील वाढता वाहतुकीचा ताण आणि सुरक्षिततेच्या दृष्टीने बसस्थानकाचे नियोजनबद्ध आधुनिकीकरण करणे अत्यावश्यक असल्याचे ना. शिवेंद्रसिंहराजे म्हणाले. त्याला ना. सरनाईक यांनी सकारात्मक प्रतिसाद देत संबंधित अधिकाऱ्यांना आवश्यक सूचना केल्या. 

         प्रस्तावित आराखड्यातील इन व आउट गेट एकाच मार्गावर ठेवण्याबाबत पुनर्विचार करण्याचे निर्देश देण्यात आले. भविष्यातील वाहतूक कोंडी टाळण्यासाठी स्वतंत्र प्रवेश व निर्गमन मार्ग ठेवण्यावर भर देण्यात आला. तसेच बसस्थानक परिसरातील रस्त्यांचे काँक्रिटीकरण, वाहतूक व्यवस्थापन सुलभ करणे आणि आवश्यक नागरी सुविधा उपलब्ध करून देण्याबाबत संबंधित अधिकाऱ्यांना सूचना करण्यात आल्या. प्रवाशांसाठी अद्ययावत प्रतीक्षागृह, स्वच्छतागृहे, दिव्यांगांसाठी सुलभ सुविधा, वाहनतळ व्यवस्था व सुरक्षा यंत्रणा उभारण्यावरही बैठकीत भर देण्यात आला. पुनर्बांधणीसाठी आवश्यक निधीबाबत सकारात्मक चर्चा होऊन काम गुणवत्तापूर्ण व वेळेत पूर्ण करण्याचे निर्देश देण्यात आले.

सातारा बसस्थानकाच्या पुनर्बांधणीमुळे प्रवाशांना अधिक सुरक्षित, सुटसुटीत व आधुनिक सुविधा उपलब्ध होणार असून शहराच्या वाहतूक व्यवस्थेत लक्षणीय सुधारणा होईल, असे ना. शिवेंद्रसिंहराजे यांनी यानिमित्ताने स्पष्ट केले आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

नीट चा पेपर पुन्हा होणार

नीट चा पेपर पुन्हा होणार पेपर लीक झाल्यामुळे वैद्यकीय प्रवेश परीक्षा NEET UG रद्द करण्यात आली आहे. ३ मे रोजी

Live Cricket