Home » ठळक बातम्या » आरोग्य » पूजा खेडकरचे IAS पद गेलं! UPSCची मोठी कारवाई

पूजा खेडकरचे IAS पद गेलं! UPSCची मोठी कारवाई

पूजा खेडकरचे IAS पद गेलं! UPSCची मोठी कारवाई

केंद्रीय लोकसेवा आयोगाने (UPSC) वादग्रस्त IAS अधिकारी पूजा खेडकर यांची उमेदवारी रद्द करण्यात आली आहे. नागरी सेवा परीक्षा-2022 या नुसार नियमांचे उल्लंघन प्रकरणात खेडकर दोषी आढळल्याने ही कारवाई करण्यात आली आहे.

एवढेच नव्हे तर, पूजा खेडकर यांना भविष्यातील सर्व परीक्षा आणि निवडीवरही बंदी घातली आहे. त्यामुळे पुजा खेडकरसाठी हा मोठा धक्का मानला जात आहे. यूपीएससीने पूजा खेडकर यांच्या 2009 ते 2023 या काळातील सर्व रेकॉर्ड तपासल्यानंतर ही कारवाई केली आहे.पूजा खेडकर यांना 30 जुलैपर्यंत उत्तर देण्यासाठी वेळ देण्यात आला होता. त्यांचे उत्तर न मिळाल्याने यूपीएससीने ही कारवाई केली आहे.

दुसरीकडे आज दिल्लीतील पटियाला हाऊस कोर्टात पूजा खेडकरच्या अटकपूर्व जामीन अर्जावर सुनावणी झाली. पुजा खेडकर 47 टक्के दिव्यांग असल्याचा दावा वकिलांनी न्यायालयात केला. ज्यावेळी आम्ही ‘Puja’ नाव बदलून ‘Pooja’ असं केलं त्यावेळी गॅझेट नोटिफिकेशन केलं होतं असा दावा पूजा खेडकरच्या वकिलांनी केला.

तसेच आपल्याला मिळालेलं दिव्यांग प्रमाणपत्र एम्स बोर्डाने दिलं आहे मग त्यात फ्रॉड काय? असा सवाल विचारण्यात आला. मी लैंगिक छळाची तक्रार केल्यानेच मला अशा पद्धतीने टार्गेट केलं जात असल्याचा दावा पूजा खेडकर यांनी केला. दरम्यान, न्यायालयाने पूजा खेडकरांच्या अटकपूर्व जामीनावर निकाल राखून ठेवण्यात आला आहे. कोर्ट उद्या सायंकाळी यावर निर्णय देणार आहे.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची 

Post Views: 70 मेंढपाळाचा  लेक आता IPS बनला गाथा संघर्षाची देशातल्या युवकांना मार्गदर्शनाची  कोल्हापूर जिल्ह्याच् कागल तालुक्यातील बिरदेण डोणेच्या यशातही

Live Cricket