सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना महाबळेश्वर वनपरिमंडळ अधिकारी सुनील लांडगे यांच्या पथकाची मोठी कारवाई; खवले मांजर खवले जप्त येवती येथे शिवतेज सामाजिक संस्थेच्या वतीने शिवजयंती निमित्त मोफत नेत्र तपासणी शिबिर व भव्य लेझीम पथकाचा कार्यक्रम  प्राथमिक शिक्षक सहकारी बँकेचे कामकाज आदर्शवत वर्धापन दिनी जिल्हा परिषद अध्यक्षा मा.डॉ.सौ. प्रियाताई शिंदे यांची सदिच्छा भेट केळघर येथे उद्या महात्मा बसवेश्वर महाराज जयंतीनिमित्त विविध कार्यक्रमांचे आयोजन श्रीक्षेत्र पार्वतीपूर पारसोंड येथे आदिशक्ती श्रीरामवरदायिनी मातेचा यात्रोत्सव; सोळाव्या वर्षीही विविध सामाजिक व क्रीडा स्पर्धांचा जागर!
Home » राज्य » प्रशासकीय » सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा

सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा 

सातारा जिल्ह्यात पेट्रोल आणि डिझेलचा पुरेसा साठा 

सातारा – सध्याची आंतरराष्ट्रीय स्तरावरील आणि आखाती देशांमधील युद्धजन्य परिस्थिती पाहता, इंधनाचा तुटवडा भासण्याची भीती दाखवून काही घटकांकडून इंधनाची साठेबाजी किंवा काळाबाजार होण्याची शक्यता नाकारता येत नाही. या पार्श्वभूमीवर सातारा जिल्ह्यातील सर्व नागरिकांना जाहीर आवाहन करण्यात येते की, पेट्रोल आणि डिझेलचा पुरवठा व साठा मुबलक प्रमाणात असलेबाबत शासनस्तरावरुन कळविणेत आले असून जिल्हा प्रशासन इंधन पुरवठ्यावर सतत लक्ष ठेवून आहे. या संदर्भात IOCL, BPCL, HPCL या तिन्ही ऑईल कंपन्यांचे सेल्स ऑफिसर यांनी सातारा जिल्ह्यात कोणत्याही प्रकारचा इंधन तुटवडा नसल्याचे सांगितले असून Advance Payment या System मुळे काही पंपावर पुरवठा झाला नसल्याचे स्पष्ट करण्यात आले आहे. त्यामुळे नागरिकांनी कोणत्याही अफवांवर विश्वास ठेवू नये किंवा घाबरून जाऊन गरजेपेक्षा जास्त इंधनाची खरेदी व अनावश्यक साठवणूक करू नये, असे आवाहन प्रशासनातर्फे करण्यात आले आहे.

युद्धजन्य परिस्थितीचा गैरफायदा घेऊन इंधनाचा अनधिकृत साठा करणे किंवा चढ्या दराने विक्री करणे हा जीवनावश्यक वस्तू कायदा १९५५ (Essential Commodities Act 1955) नुसार गंभीर गुन्हा असून अशा प्रकारची कोणतीही कृती करणा-याविरुद्ध कारवाई करणेत येईल.

तसेच सुरक्षेच्या कारणास्तव कोणत्याही परिस्थितीत प्लास्टिकच्या बाटल्या, कॅन, ड्रम किंवा इतर अप्रमाणित कंटेनरमध्ये इंधनाची विक्री करण्यास पूर्णपणे बंदी घालण्यात आली आहे. अशा प्रकारे इंधन साठवणे हे सुरक्षिततेच्या नियमांचे उल्लंघन असून ते अत्यंत धोकादायक आहे. अशा परिस्थीतीत जर एखादा पंपचालक बाटलीत इंधन देताना किंवा साठेबाजी अथवा काळाबाजार करताना आढळल्यास, कोणत्याही पूर्वसूचनेशिवाय संबंधित पंपचालक आणि ग्राहक या दोघांवरही कठोर कारवाई करण्यात येईल. नियमांचे उल्लंघन करणाऱ्या पंपांचा परवाना कायमस्वरूपी रद्द करण्याची शिफारस देखील करण्यात येईल. जिल्ह्यातील सर्व नागरिकांनी राष्ट्रीय सुरक्षेच्या दृष्टीने प्रशासनास सहकार्य करावे आणि अशा प्रकारच्या बेकायदेशीर कृत्यांची माहिती मिळाल्यास तात्काळ जिल्हा पुरवठा कार्यालयाशी संपर्क साधावा.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना

सातारा वनपरिक्षेत्रात ग्रामस्थांना सतर्कतेचे धडे; संघर्ष कमी करण्यासाठी उपाययोजना मानव–वन्यजीव संघर्ष कमी करण्यासाठी सातारा वनपरिक्षेत्रातील ग्रामस्थांची बैठक सातारा प्रतिनिधी -अधिकारी

Live Cricket