महाबळेश्वरचा चेहरामोहरा बदलण्यासाठी ‘अनुभवा’वर विश्वास; डी. एम. बावळेकर यांच्या उमेदवारीला जनतेचा उत्स्फूर्त प्रतिसाद..
महाबळेश्वर – पर्यटननगरी महाबळेश्वरच्या आगामी नगरपलिका निवडणुकीचे बिगुल वाजले असून, शहराच्या राजकीय पटलावर ‘अनुभव आणि विकास’ हाच कळीचा मुद्दा ठरत आहे. लोकमित्र आघाडीचे नगराध्यक्षपदाचे उमेदवार आणि माजी नगराध्यक्ष डी. एम. बावळेकर यांच्या प्रचाराने सध्या मोठी गती घेतली आहे.
अनुभवाचा कस आणि विकासाची दृष्टी:
महाबळेश्वरसारख्या जागतिक दर्जाच्या पर्यटन स्थळाचे नियोजन करणे हे केवळ राजकीय आश्वासन नसून, त्यासाठी प्रशासकीय अनुभवाची मोठी जोड लागते. डी. एम. बावळेकर यांनी त्यांच्या नगराध्यक्षपदाच्या कार्यकाळात पाणीपुरवठा, स्वच्छता आणि वाहतूक व्यवस्थापनात जे ठोस निर्णय घेतले, त्याची प्रचिती आजही नागरिकांना येत आहे. यामुळेच, एका ‘परीक्षित’ आणि ‘सक्षम’ नेतृत्वाकडे शहराच्या चाव्या सोपवाव्यात, असा सूर मतदारांमध्ये उमटत आहे.
केवळ रस्ते आणि गटारे नव्हे, तर शहराचा सर्वांगीण विकास कसा असावा, याचा एक ठोस आराखडा बावळेकर यांनी जनतेसमोर मांडला आहे. त्यांच्या विकास संकल्पनेत खालील मुद्द्यांवर विशेष भर देण्यात आला आहे.
स्थानिक अर्थव्यवस्था: व्यापारी वर्ग आणि तरुणांच्या हाताला काम मिळेल अशा संधी निर्माण करणे.
पायाभूत सुविधा: आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून शहराचे सौंदर्यीकरण करणे.
लोकमित्र आघाडीचे पदाधिकारी आणि कार्यकर्ते सध्या ‘ॲक्शन मोड’मध्ये दिसत आहेत. प्रत्यक्ष घरोघरी जाऊन मतदारांशी संवाद साधणे, जुन्या कामांचा लेखाजोखा मांडणे आणि भविष्यातील योजनांची माहिती देणे यावर भर दिला जात आहे.




