Post Views: 29
पसरणी तालुका वाई येथे वीज पडल्याने बकऱ्या ठार
वाई :- प्रतिनिधी सुनिल जाधव (पाटील) पसरणी ता.वाई येथे दिनांक ०५/०६/२०२४ रोजी दुपारी २ ते २ वाजुन ३० मिनिटां दरम्यान डोंगरांच्या पायथ्याला विजेच्या गडगडाट होवुन वीज पडुन ३८ बकरी मृत्युमुखी पडल्या.जगन्नाथ श्रीपती कोळेकर रा.नांदल ता.फलटण जि.सातारा हे आपल्या १५० बकरी सोबत उपजिवीकेसाठी पसरणी ता.वाई येथें शेतात बकरी वास्तव्यास होती.त्यापैकी ३८ बकरी म्रत्युमुखी पडली आहेत ती ट्रालीत भरलेली आहेत.७४ बकरी पुरात वाहुन गेली व फरार झाली.व ३८ बकरी जिवंत आहेत.या घटनेमुळे सदर मेंढपाळाचे अतोनात लाखो रूपयांचे नुकसान झाले आहे. पसरणी ग्रामस्थांच्या वतीने मदतीचे आवाहन करणेत आले आहे.