अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने सैनिकांसाठी विद्यार्थ्यांचा प्रेमाचा धागा; ५०० जवानांना राख्या अन् मिठाई मंजू इन्स्टिट्यूट ऑफ टेक्नॉलॉजीच्या फॅशन डिझाईनिंग व हॉटेल मॅनेजमेंट विभागाचा उपक्रम गणेशोत्सव मंडळांनी विहित परवानगीसाठी अर्ज सादर करण्याचे-सहायक धर्मादाय आयुक्तांचे आवाहन नेपाळ पूरग्रस्त भागात अडकलेल्या नागरिकांसाठी बीजिंग व काठमांडू भारतीय दूतावासाचे हेल्पलाइन क्रमांक जाहीर ऐतिहासिक प्रतापसिंह महाराज उद्यानाच्या विकासासाठी ५ कोटींचा निधी मंजूर परिक्षा केंद व परीसरात भारतीय नागरिक सुरक्षा संहिता 2023 चे कलम 163 लागू
Home » राज्य » शिक्षण » सामाजिक » संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न; वाहतूक नियमन आणि उपाययोजनांवर भर

संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न; वाहतूक नियमन आणि उपाययोजनांवर भर

संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक संपन्न; वाहतूक नियमन आणि उपाययोजनांवर भर

सातारा,  : संसदीय जिल्हा रस्ता सुरक्षा समितीची बैठक खासदार श्रीमंत छत्रपती उदयनराजे भोसले यांच्या अध्यक्षतेखाली व पालकमंत्री शंभूराज देसाई यांच्या प्रमुख उपस्थितीत संपन्न झाली.

 जिल्हाधिकारी कार्यालयात झालेल्या या बैठकीला जिल्हाधिकारी संतोष पाटील, मुख्य कार्यकारी अधिकारी याशनी नागराजन, उपवनसंरक्षक अमोल सातपुते, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विश्वास सातपुते, कार्यकारी अभियंता राहुल अहिरे यांच्यासह विविध विभागांचे अधिकारी उपस्थित होते.

नवीन महामार्गाच्या कामामुळे शेतामध्ये साचणाऱ्या पाण्याची योग्य विल्हेवाट लावण्यासाठी उपाययोजना कराव्यात, अशा सूचना करून खासदार श्री. भोसले म्हणाले, काही पेट्रोलपंपालगत डिव्हायडर तोडले आहेत, ते पूर्वतवत जोडावेत. वाहनचालकांनी महामार्गावर व इतर रस्त्यांवर वाहतुकीच्या नियमांचे तंतोतंत पालन करण्यासाठी उपाययोजना कराव्यात. तसेच तालुकास्तरीय समित्या नेमून ब्लॅकस्पॉट शोधून त्यावर उपाययोजना कराव्यात. त्याचबरोबर ट्रॉमा केअर सेंटरसाठी डॉक्टर आणि कर्मचारी यांची संख्या आरोग्य विभागाने वाढवावी, अशा सूचना खासदार श्री. भोसले यांनी केल्या.

रस्ता सुरक्षेच्या दृष्टीने जड मालवाहतूक करणारी वाहने ही रस्त्याच्या उजव्या बाजूऐवजी डाव्या बाजूने चालविण्याच्या शासनाच्या सूचना आहेत. परंतु जड मालवाहतूक करणारे वाहनधारक या नियमांचे पालन करीत नाहीत. त्यामुळे अपघातांचे प्रमाण व वाहतूक कोंडीच्या समस्येला वारंवार तोंड द्यावे लागते. महामार्गालगत अनेक पोलीस ठाणी आहेत. या ठाण्यातील पोलीस अधिकारी, कर्मचाऱ्यांनी नियम मोडणाऱ्या जड वाहतूक करणाऱ्या वाहनधारकांवर कारवाई करावी, अशा सूचना पालकमंत्री श्री. देसाई यांनी केल्या.

Leave a Comment

RELATED LATEST NEWS

Top Headlines

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची मने

अ‍ॅस्टॉन हॉस्टेल व नचिकेतास हायस्कूल अँड ज्युनिअर कॉलेज, पांचगणी येथे ‘ईद-ए-मिलाद’ उत्साहात; विद्यार्थ्यांचे प्रबोधनात्मक नाटक व सुश्राव्य कव्वालीने जिंकली उपस्थितांची

Live Cricket