पार्ले गावात आमदार मनोजदादा घोरपडे यांच्या हस्ते 1 कोटी 6 लाखांच्या विकासकामांचे भूमिपूजन
कराड प्रतिनिधी:कराड उत्तर विधानसभा मतदार संघाचे लोकप्रिय आमदार मा. श्री. मनोजदादा घोरपडे आणि सातारा-सांगली विधानपरिषद आमदार मा. श्री. धैर्यशील दादा कदम यांच्या शुभहस्ते तालुक्यातील पार्ले गावात एकूण 1 कोटी 6 लाख रुपये किमतीच्या विविध विकासकामांचे भूमिपूजन संपन्न झाले.
यावेळी मृद व जलसंधारण विभागासाठी 43 लाख, लघु पाटबंधारे विभागासाठी 15 लाख, ज्योतिर्लिंग मंदिर सभामंडपासाठी 10 लाख, रस्ता काँक्रीटीकरण व पेव्हर ब्लॉकसाठी 30 लाख आणि गोपाळनगर येथील लक्ष्मी मंदिरासमोरील काँक्रीटीकरणासाठी 8 लाख रुपयांच्या कामांचा समावेश आहे.
कार्यक्रमाला प्रमुख उपस्थिती म्हणून कोयना दूध संघाचे चेअरमन बाबुराव धोकटे बापू, जिल्हा परिषद सदस्य सागर शिवदास, पंचायत समिती उपसभापती सौ. अनिताताई वेताळ, हिंद केसरी पै. संतोष वेताळ आबा, पंचायत समिती सदस्य प्रियंकाताई पळसे, माधवीताई पाटसुपे, महिला मोर्चा अध्यक्षा सीमाताई घार्गे, सरपंच अश्विनीताई मदने, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद गायकवाड आप्पा, उपसरपंच मोहन पवार नाना, उपाध्यक्ष राहुल पाटील, पार्लेकर कोपर्डे मंडल अध्यक्ष तुकाराम नलवडे, शैलेश चव्हाण काका, कामगार नेते नवनाथ पाटील, प्रकाश पवार, अजय जगदाळे, दत्तात्रय शेलार, मुरलीधर पोळ, अमोल पवार आप्पा, महेश चव्हाण आण्णा, प्रीतम शिंदे आदी मान्यवर उपस्थित होते.
यावेळी बोलताना आमदार मनोजदादा घोरपडे म्हणाले, “कराड उत्तरच्या सर्वांगीण विकासासाठी शासन निधी उपलब्ध करून दिला आहे. शेती, रस्ते, मंदिर आणि पाणी या मूलभूत सुविधांवर भर देऊन गावाचा कायापालट केला जाईल.”
आमदार धैर्यशील दादा कदम यांनी देखील विकासकामांसाठी शुभेच्छा देत सरकारच्या माध्यमातून अधिक निधी उपलब्ध करून देण्याचे आश्वासन दिले.भूमिपूजनानंतर गावकऱ्यांनी आमदार मनोजदादा घोरपडे यांचे आभार मानले.





