पाचगणी नगरपालिकेत उत्साहात स्वातंत्र्यदिन साजरा; नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते ध्वजारोहण
पाचगणी : देशाचा ८० वा स्वातंत्र्यदिन १५ ऑगस्ट रोजी पाचगणी येते अत्यंत उत्साहात आणि देशभक्तीपूर्ण वातावरणात साजरा करण्यात आला. नगराध्यक्ष दिलीपभाऊ बगाडे यांच्या हस्ते मुख्य दिमाखात राष्ट्रध्वज फडकवून ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी उपस्थितांनी राष्ट्रध्वजाला मानवंदना देत राष्ट्रगीत गायले.
या राष्ट्रीय सोहळ्यास नगरपालिकेचे नगरसेवक, अधिकारी, कर्मचारी तसेच नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. स्वातंत्र्यदिनानिमित्त नगरपालिका परिसरात देशभक्तीचा उत्साह पाहायला मिळाला.
यावेळी वैभव कऱ्हाडकर, राजश्री सणस, नरेंद्र बिरामणे, सुप्रिया माने, आकाश बगाडे, विमल भिलारे, शेखर कासुर्डे, परवीन मेमन, प्रसाद करंजकर, शिल्पा माने, विनोद बिरामणे, माधुरी कासुर्डे, लक्ष्मी कऱ्हाडकर, राजेंद्र पारठे, अभिलाषा कऱ्हाडकर, अमित कांबळे, स्वाती कांबळे, प्रकाश गोळे, महेश खांडके, अमृता गोळे यांच्यासह गणेश कासुर्डे, प्रवीण बोधे, नानासाहेब कासुर्डे, गॅब्रियल फर्नांडिस आणि साहेबराव बिरामणे यांची प्रमुख उपस्थिती होती.
स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने उपस्थित मान्यवरांनी देशाच्या स्वातंत्र्यासाठी बलिदान देणाऱ्या स्वातंत्र्यसैनिकांचे स्मरण करून राष्ट्राच्या प्रगतीसाठी एकजुटीने कार्य करण्याचे आवाहन केले.




